• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sukhavindar Singh badal attack : सुखविंदरसिंग यांच्यावरील हल्ला प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर, ATS कडे तपास जाताच मोठी माहिती समोर!

August 13, 2026 by admin Leave a Comment


Sukhavindar Singh Badal Attack Update : नांदेड जिल्ह्यात आज धक्कादायक घटना घडली. पंजाबमधील अकाली दलाचे प्रमुख सुखविंदर सिंग बादल यांच्यावर अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी जसपाल सिंघ हा 62 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणाचा तपास थेट एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. एटीएसने तपास हाती घेताच मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हल्ला प्रकरणी पुणे कनेक्शन समोर आले आहे. आरोपी सजपाल सिंघ हा मूळचा पुण्याचा आहे. तो दोन वर्षापासून गुरुद्वारात सेवादार म्हणून काम करीत आहे.

ही घटना घडल्यानंतर नांदेडचे पोलीस अधिक्षक नीलाभ रोहन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांंनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुखविंदर सिंग बादल नांदेडपासून जवळ असलेल्या माता साहेब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येताना सेवादाराने त्यांच्यावर हल्ला केला. सेवादाराने आपल्या जवळील क्रीपानने हा हल्ला केला. या हल्ल्यात सुखविंदर सिंग बादल यांच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी देखील जखमी झालाय.

ही घटना घडताच पोलिसांनी हल्लेखोराला तातडीने ताब्यात घेण्यात घेतले. आरोपीचे नाव जसपाल सिंघ असून तो 62 वर्षाचा आहे. तो दोन वर्षापासून गुरुद्वारात सेवादार म्हणून काम करीत आहे. आरोपीला तातडीने ताब्यात घेतले. सुखबीरसिंग बादल सध्या डॉकटरच्या देखरेखी खाली असून त्यांच्यावार उपचार सुरू आहेत. हल्ल्याचं नेमकं कारण अजून कळालं नाही तपास सुरू आहे.

पुणे कनेक्शन आलं समोर

दरम्यान, आतापर्यंत केलेल्या तपासानुसार आरोपीचे शिक्षण बीकॉम आणि एलएलबी झालेले आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी अजून समोर आलेली नाही. सुखविंदर सिंग बादल यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. आरोपी जसपाल सिंह हा मूळचा पुण्याचा राहणारा आहे. त्याने पुणे न्यायालयात वकील म्हणून काम केलेले आहे. जसपालसिंह हा गेल्या 2 वर्षांपासून नांदेडजवळील एका गुरुद्वारात सेवाभावी काम करत होता.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेल्वे पटऱ्या उखडू, विमानतळं उखडू, त्या निर्णयावर मनोज जरांगे संतापले, आंदोलनाबाबत सरकारला थेट इशारा!
  • कुंभमेळ्याच्या खर्चावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप, म्हणाले, 30 हजार कोटींमध्ये… त्या विधानाची राज्यात चर्चा
  • नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
  • रवींद्र जडेजा-सारांश जैनच्या नो बॉलमुळे टीम इंडियाची डोकेदुखी, प्रशिक्षकाने थेट सांगितला जालीम उपाय
  • Snake Safety Tips In Monsoon : कारच्या इंजिनापासून टॉयलेटपर्यंत… पावसाळ्यात साप इथेच का लपतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in