
अमेरिका आणि इराणमध्ये 28 फेब्रुवारी फेब्रुवारी पासून युद्धाला सुरुवात झाली होती. हे युद्ध तब्बल 39 दिवस चाललं, अखेर 40 दिवशी अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान युद्धकाळात इराणने इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज जहाजांसाठी बंद केल्यानं संपूर्ण जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे. त्यातील सुमारे 25 वाहातूक याच मार्गाने होते, दरम्यान त्यानंतर अमेरिकेनं इराणसोबत युद्धविरामाची घोषणा करतानाच ही अट घातली होती की, स्ट्रीट ऑफ होर्मूज तातडीने जगासाठी ओपन करावा. मात्र युद्धविरामानंतर देखील इस्त्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच होते, त्यामुळे इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज पूर्णपणे ओपन केला नव्हता. दिवसभरात केवळ 15 जहाजांनाच या मार्गाने जाण्याची परवानगी होती. त्यामुळे ऊर्जा संकट टळलं नव्हतं.
मात्र गुरुवारी इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम झाला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने हा युद्धविराम झाला. ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करताच आता इराणने मोठा निर्णय घेतला आहे. इराणने आता संपूर्ण जगासाठी पुन्हा एकदा स्ट्रीट ऑफ होर्मूज सुरू केला आहे, इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत घोषणा केली आहे. इराणने घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण जगाला मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Leave a Reply