• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देवीच्या मिरवणूक शरीराला हूक टोचून तरुण लटकला, अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याने गुन्हा दाखल

April 17, 2026 by admin Leave a Comment


देवीच्या मिरवणूकीत शरीरात हुक घुसवून नवसासाठी क्रेनला लटकणाऱ्या तरुणा विरोधात मालाड पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  १५ तारखेला मुंबईतील मालाड येथे श्री मुथू मरियम्मन देवीची मिरवणूक काढण्यात आली होती. ज्यामध्ये एका तरुणाने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या संपूर्ण शरीराला हुक लावून क्रेनच्या साहाय्याने लटकून या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. त्यामुळे त्याच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. मालाड पोलिसांनी अंधश्रद्धा आणि नरबळी यांसारख्या गंभीर आरोपांखाली एफआयआर दाखल केला आहे.

मालाड येथे श्री मुथू मरियम्मन देवीची मिरवणूक काढण्यात आली होती. यात अल्ताफ रईस खान या २३ वर्षाच्या तरुणाच्या नवस फेडण्यासाठी स्वत:च्या शरीरात हुक टोचून त्याची मिरणवूक काढण्यात आली होती. देवीच्या मिरवणुकीत हुकच्या साहाय्याने क्रेनला १५ फूट उंचीवरून लटकून सहभागी झालेल्या तरुणाच्या प्रकरणात मालाड पोलिसांनी कारवाई केली आहे. मालाड पोलिसांनी अंधश्रद्धा आणि नरबळी यांसारख्या गंभीर आरोपांखाली एफआयआर दाखल केला आहे.

इच्छा पूर्ण करण्यासाठी अघोरी प्रकार

मुंबईतील मालाड येथे देवीच्या मिरवणुकीत हुकच्या सहाय्याने क्रेनला लटकून सहभागी झालेल्या तरुणाविरोधात मालाड पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मालाड येथे १५ तारखेला श्री मुथू मरियम्मन देवीची मिरवणूक काढण्यात आली होती. ज्यामध्ये एका तरुणाने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी अघोरी प्रकार करीत आपल्या संपूर्ण शरीराला हुक लावून क्रेनच्या सहाय्याने लटकून या मिरवणुकीत सहभागी घेतला होता. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

नरबळी आणि अंधश्रद्धेअंतर्गत गुन्हा

पोलिसांनी सांगितले की, देवीच्या मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली होती, परंतु त्याव्यतिरिक्त इतर कोणताही प्रकार घडू नये याची पूर्वसूचना देखील देण्यात आली होती. त्यानंतरही, तो तरुण शरीराला हुक बांधून १५ फूट उंचीवर क्रेनला लटकत होता आणि शोभायात्रेत सहभागी होत होता. ज्यामध्ये त्याचा जीवही जाऊ शकला असता. चौकशीदरम्यान त्या तरुणाने सांगितले की, त्याने देवीकडे एक इच्छा व्यक्त केली होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तो शरीराला हुक बांधून क्रेनला लटकून शोभायात्रेत सामील झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी हुक घालणाऱ्या तरुणावर तसेच मिरवणुकीच्या आयोजकावर आणि क्रेन चालकावर देखील नरबळी आणि अंधश्रद्धा यांसारख्या आरोपांखाली गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गाडीला स्क्रॅच किंवा डेंट लागणार नाही, नवीन ड्रायव्हर्सनी ‘या’ 5 गोष्टींची नक्की काळजी घ्या
  • कधी काळी एकमेकांचे कट्टर दुश्मन होते, आज गळ्यात गळे घालतात हे देश !
  • IPL 2026 Poits Table : गुजरातला सलग तिसऱ्या विजयानंतर तगडा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?
  • OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
  • SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in