• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, SRH vs CSK : हैदराबाद आणि चेन्नईची विजयासाठी लढाई, स्पर्धेत कोणाचा वरचष्मा? वाचा आकडेवारी

April 17, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 27वा सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये होत आहे. हा सामन्यात नाणेफेकीचा कौल संध्याकाळी 7 वाजता, तर प्रत्यक्ष सामन्याला 7.30 वाजता सुरूवात होईल. आतापर्यंत दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी संमिश्र राहिली आहे. दोन्ही संघांनी पाच पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे प्रत्येकी चार गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत सनरायझर्स हैदराबादचा संघ चेन्नई सुपर किंग्सच्या तुलनेत वरचढ आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ 4 गुण आणि +0.576 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स संघ 4 गुण आणइ -0.846 नेट रनरेटसह आठव्या स्थानी आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून टॉप 4 मध्ये जागा मिळण्याची संधी असणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स हेड टू हेड

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघात 22 सामने झाले आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा वरचष्मा दिसून आला आहे. चेन्नई सुपर किंग्सने 22 पैकी 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर सनरायझर्स हैदराबादने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. मागच्या सहा सामन्यांचा विचार केला तर 2022 मध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. त्याने 2023 मध्ये दोन्ही संघाचा एकदा सामना झाला आणि हा सामना चेन्नई सुपर किंग्सने 7 विकेट राखून जिंकला. 2024 स्पर्धेत पुन्हा एक एक सामना दोन्ही संघांनी जिंकला. मागच्या पर्वात या दोन्ही संघात एकमेव सामना झाला आणि हा सामना सनरायझर्स हैदराबादने 5 विकेट राखून जिंकला. मागच्या सहा सामन्यात 3-3 अशी बरोबरी आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

दोन्ही संघांच्या खेळाडूंची स्थिती

चेन्नई सुपर किंग्स संघात दुखापतीचं सत्र सुरू आहे. वेगवान गोलंदाज खलील अहमद स्पर्धेला मुकला असून त्याची जागा मुकेश चौधरीने घेतली आहे. दुसरीकडे, फलंदाजीत संजू सॅमसनला सूर गवसला आहे. डेवॉल्ड ब्रेव्हिसही फॉर्मात आला आहे. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही याबाबतही चर्चा होत आहे. दुसरीकडे, ऑरेंज आर्मीकडून इशान किशान आणि हेनरिक क्लासेन यांचा फॉर्म चांगला आहे. तर अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. तर गोलंदाजीत प्रफुल हिंगे आणि साकिब हुसेन हे दोन प्रभावी गोलंदाज हैदराबादला मिळाले आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गाडीला स्क्रॅच किंवा डेंट लागणार नाही, नवीन ड्रायव्हर्सनी ‘या’ 5 गोष्टींची नक्की काळजी घ्या
  • कधी काळी एकमेकांचे कट्टर दुश्मन होते, आज गळ्यात गळे घालतात हे देश !
  • IPL 2026 Poits Table : गुजरातला सलग तिसऱ्या विजयानंतर तगडा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?
  • OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
  • SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in