
सोनिया सहरावत यांनी सीजेपी विरोधात केलेली पोस्ट व्हायरल झाल्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाला. सोनिया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या एका मुलीच्या आई आहे. सोशल मीडियावर त्यांनी स्वतः मुलीसोबत फोटो पोस्ट केला आहे.
सोनिया सहरावत सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. त्यांच्या फेसबूक प्रोफाईलनुसार, त्या हरियाणा येथील बहादुरगड येथे राहतात. सोशल मीडियावर स्टार आणि प्रसिद्ध असणाऱ्या सोनिया सहरावत CRPF मध्ये असिस्टंट कमांडेंट पदावर काम करतात. ज्यामुळे त्यांचं कायम कौतुक होतं.
सोनिया सहरावत उच्चशिक्षीत आहेत. सोनिया यांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात ऋषीकुल विद्यापीठ येथून केली आहे. सैन्यात काम करण्यचं सोनिया सहरावत यांचं स्वप्न होतं.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोनिया सहरावत यांनी पुढील शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केलं. आज सोनिया सहरावत अनेक महिलांच्या प्रेरणा स्थानी आहेत.
सोनिया सहरावत सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनिया कायम स्वतःचं फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
सोनिया सहरावत सोशल मीडियावर प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. फक्त इन्स्टाग्राम त्यांचे 6.3 फोलोअर्स आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोनिया सहरावत कोणालाच फॉलो करत नाहीत.
फक्त इन्स्टाग्राम नाही तर, फेसबूकवर देखील सोनिया सहरावत याच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. फेसबूकवर सोनिया सहरावत यांचे 1.71 फॉलोअर्स आहेत. तर फेसबूकवर देखील त्या कोणालाच फॉलो करत नाहीत.
सोनिया सहरावत सोशल मीडियावर कायम त्यांची पर्सनल लाईफ, फिटनेस आणि त्यांच्या कामाबद्दल फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
NEET पेपरफुटी प्रकरणात सध्या सीजेपीने आंदोलन पुकारलं आहे. या आंदोवनाला आता देशव्यापी स्वरुप मिळाले आहे. अशात सोनिया सहरावत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली. ज्यामुळे वाद निर्माण झाला.
सोनिया सहरावत यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट लगेच डीलीट केली. पण पोस्टचे स्क्रिनशॉट तोपर्यंत व्हायरल झालेले. सीजेपीने देखील त्यांच्या पोस्टचं प्रत्युत्तर दिलं. 'आम्ही झुरळ आहोत आणि झुरळ कधी मरत नाही…' असं सीजेपीने म्हटलं होतं.









Leave a Reply