
Sonam Wangchuk Net Worth : शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आहे. NEET पेपर फुटी प्रकरण, विद्यार्थ्यांची आत्महत्येच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पुकारलं… त्यांचं समर्थन करत सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. पण 21 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांना बळजबरी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अशात सोनम वांगचुक यांच्या पत्नी जे. जे. आंग्मो यांनी पतीला सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्याची विनंती तर, दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला… त्यांच्या याचिकेवर रविवारी तात्काळ सुनावनी करण्यात आली. त्यानंतर सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं…
दरम्यान, वांगचुक यांच्या संपत्तीबद्दल मोठी चर्चा सुरु झाली आहे. सोनम वांगचुक यांची कमाई कुठून होते याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. सांगायचं झालं तर, सोमन वांगचुक याचा स्वतःचा युट्यूब चॅनेल आहे. चॅनले लाखो सब्सक्रायबर आहेत. रिपोर्टनुसार, चॅनलमधून त्यांची महिन्याला 3 – 7 लाख रुपयांपर्यंत कमाई होते. एवढंच नाही तर, राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर लेक्चर, कॉन्फ्रेंस आणि मोटिव्हेशनल स्पीचच्या माधमातून देखील मोठी कमाई होते.
किती श्रीमंत आहेत सोनम वांगचुक?
सांगायचं झालं तर, सोनम वांगचुक यांनी त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेबाबत किंवा एकूण संपत्तीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 75 लाख रुपये असल्याचं मानलं जातं आहे. काही रिपोर्टमध्ये, यापेक्षाही अधिक आकडा नमूद केला आहे; तरीही, याबाबत कोणतीही नेमकी अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.
सोनम वांगचुक यांचं चर्चेत असण्याचं नेमकं कारण काय?
NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील अनियमितता आणि गैरप्रकारांचा निषेध करण्यासाठी, तसेच शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि परीक्षा पद्धतीत सुधारणांची मागणी करण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषण केल्यामुळे सोनम वांगचुक चर्चेत आले आहेत. उपोषणाच्या 21 व्या दिवशी, प्रकृती खालावल्यामुळे आणि Dehydration ची लक्षणं दिसून आल्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; मात्र, त्यांनी तिथे उपचार घेण्यास नकार दिला.
एवढंच नाही तर, सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात देखील उपोषण सुरु ठेवलं आहे. हे प्रकरण आता देशव्यापी झालं आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार म्हणजे आजपासून रोजी सुरू होत असून 13 ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार आहे. तर, दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीने मोर्चा काढला आहे. 20 जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने लोक जंतर – मंतर येथे पोहोचले असून, आता आंदोलन सुरु आहे.
Leave a Reply