• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द

July 18, 2026 by admin Leave a Comment


सामाजिक कार्यकर्ते आणि इंजिनिअर सोनम वांगचूक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मागच्या 20 दिवसांपासून सोनम वांगचूक आमरण उपोषणाला बसले होते. आज सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांचं आमरण उपोषण आंदोलन मोडून काढलं व त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. सोनम वांगचूक यांच्याबद्दल सोशल मीडियावर भरपूर चर्चा सुरु आहे. अनेकांना त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत आहे. जंतर-मंतरवर जी पोलीस कारवाई झाली, त्यावर सुद्धा अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. कुठल्या आंदोलनामुळे सोनम वांगचूक चर्चेत आल्याची ही पहिली वेळ नाहीय.

लडाखचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी लडाख ते दिल्ली पायी मार्च काढल्यामुळे सुद्धा ते चर्चेत आले होते. सोनम वांगचूक पेशाने इंजिनिअर आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचं काम आणि इनोवेशनसाठी सुद्धा लोक त्यांना ओळखतात. हिमालयीन क्षेत्रातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सुद्धा त्यांनी बरचं काम केलं आहे. सोनम वांगचूक यांनी लोकांचं आयुष्य सुसह्य बनवण्यासाठी केलेली तीन कामं जाणून घ्या.

आइस स्तूप

‘आइस स्तूप’ हे सोनम वांगचूक यांचं सर्वात चर्तित इनोवेशन आहे. लडाख सारख्या उंचावरील क्षेत्रात शेती करताना पाण्याची कमतरता मोठी समस्या असते. या समस्येचा सामना करण्यासाठी आइस स्तूपचा विचार समोर आला.

थंडीच्या सीजनमध्ये पाण्याला शंकुच्या आकारात जमा करुन बर्फाचा विशाल डोंगर तयार केला जातो. गरमी वाढल्यानंतर हळूहळू बर्फाचा हा डोंगर वितळू लागतो. त्यामुळे गरजेच्यावेळी पाणी उपलब्ध होतं. खास बाब म्हणजे यासाठी वीजेची आवश्यकता भासत नाही. वातावरण बदल आणि बर्फवृष्टीच्या बदलत्या पॅटर्नमुळे अशा प्रकारचं समाधान लडाख सारख्या उंचावरील प्रदेशासाठी फायद्याचं ठरलं आहे.

हिटर विना गरम घर 

लडाखमध्ये थंडीच्या काळात तापमान उणेमध्ये असतं. अशावेळी घरं गरम ठेवणं सोपं नसतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची आणि ऊर्जेची गरज लागते. सोनम वांगचूक आणि SECMOL च्या विद्यार्थ्यांनी या समस्येवर सुद्धा काम केलं.

स्थानिक माती आणि सहज मिळणाऱ्या साहित्याच्या मदतीने अशा इमारतींच्या डिझाइनवर काम केलं, जे सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा चांगल्या पद्धतीने वापर करतील. पॅसिव सोलर टेक्निकवर आधारित या इमारतींचा उद्देश खूप थंड वातावरणात पारंपारिक हीटिंग सिस्टिमवरील अवलंबित्व कमी करणं आहे. यामुळे ऊर्जा आणि इंधनाची बचत होईल.

SECMOL शिक्षणाचं अनोखं मॉडलं 

SECMOL फक्त शाळा म्हणून पाहणं चुकीच ठरेल. इथे विद्यार्थ्यांना कॅम्पसचं संचालन आणि वास्तविक प्रोजेक्ट्समध्ये सहभागाची संधी मिळते. सस्टेनेबल बिल्डिंग आणि रिन्यूएबल एनर्जी सारख्या क्षेत्रात काम करुन व्यवहारिक अनुभव मिळवतात.

या मॉडलमध्ये विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा पास करण्यासाठी तयार केलं जात नाही, तर समस्या ओळखून त्यावर तोडगा शोधण्याच्या प्रक्रियेशी जोडलं जातं. म्हणूनच सोनम वांगचूक यांच्या SECMOL ची शिक्षणाशी संबंधित चर्चित प्रयोगामध्ये गणना होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flash Flood: दैवी चमत्कार? मोठमोठ्या इमारती, पूल सर्वच वाहून गेलं, मग नेपाळमधील हिरवं घर कसं वाचलं?; कारण काय?
  • Bandra Accident | मोबाईलवर बोलत कार चालवणं जीवावर बेतलं! वांद्र्यात भरधाव कारची चिमुरड्याला धडक; अंशचा दुर्दैवी मृत्यू
  • शिंदे गट सुप्रीम कोर्टाच्या आगामी निकालाला मंत्री, आमदार घाबरले का? सचिन अहिर यांच्याकडून मोजक्या शब्दात प्रत्युत्तर
  • Sanjay Raut : बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष..संजय राऊतांनी उपकारांची करुन दिली आठवण
  • Nashik | तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर! मध्यरात्रीपासून भाविकांची तुफान गर्दी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in