
पंजाबी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर मंजीत कौरचा 26 ऑगस्टला PGIMER रुग्णालयात मृत्यू झाला. दोन महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. मंजीतचं चंदीगडमधून अपहरण करुन तिला मोरिंदा येथील जंगलात नेण्यात आलेलं. तिथे एका झाडाला बांधून तिला जाळण्यात आलं. गंभीररित्या भाजलेल्या मंजीतवर PGIMER रुग्णालयात उपचार सुरु होते. 26 ऑगस्टला तिचा मृत्यू झाला. आई कांता देवी पोलिसांना जाऊन भेटल्यानंतर पंजाब पोलिसांनी आता अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. मंजीत कौर शुद्धीवर असताना ती साक्ष द्यायला तयार होती, तरीही तिची जबानी का घेतली नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कांता देवी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मंजीतच्या दोन ओळखीच्या लोकांनी शुभी आणि पिंडाने तिला 3 जुलैच्या रात्री चंदीगड सेक्टर 34 मध्ये भेटायला बोलावलं होतं. आईच्या आरोपानुसार, दोघांनी तिला मारहाण केली. जबरदस्ती तिला गाडीत बसवलं व मोरिंदा येथील जंगलात घेऊन गेले. त्या दोघांनी मंजीतला झाडाला बांधल व तिला पेटवून दिलं. त्यानंतर दोघे तिथून पसार झाले. पळालेल्या दोघांपैकी एक जण पुन्हा तिथे आला व ब्लँकेट टाकून त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
तपास अधिकाऱ्याला कळवल्याची नोंद
मंजीतला त्यांनी मोरिंदा येथील रुग्णालयात नेलं. नंतर मोहालीच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. नंतर मंजीतला चंदीगडच्या PGIMER रुग्णालयात हलवण्यात आलं. मृत्यू होईपर्यंत तिच्यावर तिथेच उपचार सुरु होते. मंजीत शुद्धीत आल्यानंतर तिला जबानी द्यायची होता. ती शुद्धीत आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. PGIMER मधील पोलीस चौकीकडून तपास अधिकाऱ्याला या बद्दल कळवण्यात आलं. पण तो जबानी घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला नाही. पीजीआय पोलीस पोस्टच्या रोजच्या डायरी नोंदीत तपास अधिकाऱ्याला कळवल्याची नोंद आहे. मंजीतवर दोन महिने उपचार सुरु होते. पण कुठलही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं नाही.
मंजीत हयात असताना पोलिसांनी काही केलं नाही. आता तिच्या मृत्यूनंतर हत्येमागचा उद्देश शोधून काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. मंजीत तिथे का गेली होती? सेक्टर 34 मधील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.
Leave a Reply