• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘एकत्र जगलो, आता एकत्रच मरू…’; मरण समोर, पण आजारी नवऱ्याची साथ सोडण्यास नकार, रमायाची कहाणी डोळ्यात पाणी आणेल

August 29, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमध्ये विनाशकारी जलप्रलय आल्याने हाहाकार उडाला आहे. या जलप्रलयात 626 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. अनेकांची घरे वाहून गेली. शेती वाहून गेली अन् जनावरेही वाहून गेलीय. संपूर्ण संसारच उद्ध्वस्त झाला आहे. क्षणार्धात सर्व होत्याचं नव्हतं झालं आहे. काही लोक तर आजही आपल्या घरातील व्यक्तींचा वणवण करत शोध घेत आहेत. काही लोक जगण्यासाठी इतरत्र गेले आहेत. तर काहीजण अजूनही आपल्या घरातील आजारी व्यक्तींना सोडून जायला तयार नाहीत. एका बुजुर्ग महिलेनेही आपल्या आजारी नवऱ्याला सोडून जाण्यास नकार दिलाय. आता एकत्रच जगू आणि एकत्रच मरू. पण मी नवऱ्याला सोडून जाणार नाही. जे होईल ते, असं ही बुजुर्ग महिला म्हणत आहे.

रमाया तमांग असं या बुजुर्ग महिलेचं नाव आहे. रमाया ही 60 वर्षाची आहे. ज्या त्रिशूली बाजारात सर्व काही नष्ट झालं, तिथल्या आपल्या घराच्या बाहेर रमाया एकटीच बसून एकटक पाहत असते. काही तरी मदत मिळेल, कोणी तरी विचारपूस करायला येईल ही तिला आशा आहे. जेव्हा मीडियाची नजर रमायावर पडली. तेव्हा त्यांनी तिच्याशी संवाद साधला. संवाद साधताना रमायाने जे काही सांगितलं त्याने सर्वांच्या पायाखालची वाळूच सरकली. क्षणभर काळजात धस्स झालं.

बाजारात स्मशान शांतता

नेपाळच्या त्रिशूली बाजारातही पुराचं तांडव माजलं होतं. या बाजाराचा मोठा भाग नेस्तनाबूत झाल आहे. आता चीनने तिबेटमध्ये दुसरं सरोवर फुटण्याचा इशारा दिला आहे. नेपाळ प्रशासनाने त्रिशूली बाजार खाली केला आहे. लोकांना निघून जायला सांगितलं आहे. त्यामुळे हा बाजार खाली झाला आहे. संपूर्ण बाजारात शुकशुकाट पसरला आहे. स्मशान शांतता परसली आहे. पण रमाया मात्र त्रिशूली बाजार सोडून गेलेली नाहीये. ती आपल्याच घरात आहे.

नवऱ्याला कसं टाकून जाऊ?

सर्व लोक आपला बोऱ्या बिस्तरा घेऊन सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. तू का जात नाही? असा सवाल रमायाला करण्यात आला. त्यावर ती म्हणाली, कुठे जाऊ? घरात नवरा आजारी आहे. तो चालू शकत नाही. त्याला सोडून, टाकून कसं जाऊ? आम्ही एकत्र एवढी वर्ष काढली. एकमेकांच्या सुखदु:खाचे साक्षीदार झालो. सोबतच जगलो. आता सोबतच मरू. यावेळी तिने तिच्या कुलदैवतेला प्रार्थना केली. आता देवाला जे करायचं तेच होईल. पण नवऱ्याला अशा अवस्थेत टाकून जाता येणार नाही, असं रमाया म्हणाली.

रमायाची कहाणी नवरा बायकोच्या अतूट नाश्त्याचे बंध उलगडवून दाखवते. आजच्या काळात थोड्यास्या कारणाने लोक एकमेकांच्या जीवावर उठतात, अशावेळी संकटाच्या काळात सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी असूनही केवळ नवरा आजारी आहे. तो चालू शकत नाही म्हणून रमाया त्याच्यासोबत जीव धोक्यात घालून गावात राहिली आहे. यातून आजच्या पिढीला बरंच शिकण्यासारखं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Suryakumar Yadav : मी म्हटलं कसं शक्य आहे, पण..टी20 वर्ल्ड कप जिंकूनही संघातून वगळण्यावर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच सोडलं मौन
  • 8th Pay Commission: हे 5 महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या… पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांचा कसा होणार फायदा?
  • अखेर भीती खरी ठरली! नेपाळ-तिबेट सीमेवरील सरोवर फुटलं; बिहारमध्ये हायअलर्ट
  • Chitra Wagh : कोण आहे प्रांजली मॅडम? तिला माहितीय का ही बाई इथे.. हॉस्पिटलच्या दारातच चित्रा वाघ यांना संताप अनावर
  • मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नाराज; भाजप नेत्यांवरच केले गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in