• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Snake Facts: माणसासारखंच सापांना टेन्शन? मग चवताळलेला नाग करतो हल्ला? जरा जपूनच राहा

June 11, 2026 by admin Leave a Comment


Snake’s Amazing Facts: सापांचे जग विस्मयकारक आहे. सापाविषयी लोकांच्या मनात अनेक शंका-कुशंका आहेत. साप म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. बिनविषारी साप चावला तरी अनेकांचा धसकी घेतल्याने मृत्यू होतो. पण माणसांप्रमाणे, इतर प्राण्यांप्रमाणे सापाला सुद्धा टेन्शन येतं का? त्यालाही तणाव जाणवतो का? अर्थात त्याचा हा ताण-तणाव भावनात्मक नसतो. तर त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. त्याला जर वारंवार त्रास दिला. जागेतील बदल, उष्ण वातावरण, भूक लागणे वा हल्ला होण्याची भीती असली की सापाला तणाव येतो. सापाची चिडचिड वाढते. सापांवर सातत्याने संशोधन सुरू आहे. त्यातून त्याच्या व्यवहाराविषयी अनेक बाबी समोर येत आहे.

लवकर शिकार न मिळाल्यास चिडचिड

सापाला लवकर त्याची शिकार न मिळाल्यास त्याची अस्वस्थता वाढते. त्याला अनेक दिवस काहीच खायला मिळाले नाही तर चिडचिड होते. इतकेच नाही तर काही प्रकरणात साप याची भोजनावरची वासना उडाल्याचेही समोर आले आहे. उंदीर अथवा इतर प्राणी समोर असतानाही तो त्यांची शिकार करत नसल्याचेही समोर आले आहे. हा तणावाचाच एक प्रकार असल्याचे मानले जाते.

तणाव असल्यास लपतो साप

साप जर जास्तच तणावात असेल तर तो बाहेर पडत नाही. तो शांत ठिकाणी, थंड ठिकाणी राहतो. दीर्घकाळ तो एखाद्या कोपऱ्यात, दगडाखाली अथवा एखाद्या बिळात लपतो. ज्या ठिकाणी तो स्वतःला सुरक्षित समजतो. तिथे तो लपतो. अशावेळी तो शिकार करत नसल्याचेही संशोधनातून समोर आले आहे.

अति ताण आल्यास हल्ला?

संशोधकांच्या मते साप अति तणावात आल्यास तो थेट हल्ला चढवतो. कधी कधी तो कोणतेही कारण नसताना फुत्कारतो. शरीराला एका विशिष्ट आकारात घेत हल्ल्याची तयारी करतो. सातत्याने फणा काढतो. वारंवार हल्ल्याचा प्रयत्न करतो. ही सर्व लक्षणं ही ताणतणावाची आणि त्याच्या इच्छेविरोधात काहीतरी घडल्याची असतात. कधी कधी तो हे प्रकार स्वतःला वाचवण्यासाठी सुद्धा करतो. साप जेव्हा अति ताणात असतो, तेव्हा तो आक्रमक होतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आशा भोसलेंच्या या गाण्यातील शब्दामुळे निर्माण झालेला मोठा गैरसमज; स्पष्टीकरणासाठी आशा भोसलेंना रेडिओवर यावे लागले
  • Mirzapur The Movie Teaser: मिर्झापूरमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजीत थरार; आता लढाई सिंहासनासाठी नाही तर..
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी एक दुर्मिळ योगायोग, स्नान आणि दानाचा मोठा दिवस असल्याने ‘या’ गोष्टी करा दान
  • मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी… राजकारणात मोठं घडतंय?
  • ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा… जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होताच नंबर १ वर ट्रेंडिंग; कमाई १२५०० कोटी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in