• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Snake Bite: साप चावल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळाच… नाहीतर कार्यक्रम झालाच म्हणून समजा! ही चूक बेतणार जीवावर

July 15, 2026 by admin Leave a Comment


Snake Bite: देशात दरवर्षी साप चावल्यानंतर अनेकांचा जीव जातो. लागलीच इलाजाने व्यक्तीचा जीव वाचू शकतो. साप चावल्यानंतर वेगाने चालणे, धावणे असे प्रकार करणे धोक्याचे मानले जाते. तसेच काही खाणं आणि पिणंही मृत्यूला आमंत्रण मानलं जातं. अशा परिस्थिती संयम ठेवत झटपट डॉक्टरकडे रुग्णाला नेणे गरजेचे असते. अर्थात रुग्णाला उपाशी ठेवण्याची गरज नाही. जोपर्यंत डॉक्टरांकडे रुग्णाला घेऊन जात नाही, तोपर्यंत मात्र दक्षता घेणे आवश्यक आहे. कारण रुग्णाला काही खाण्यास-पिण्यास दिले तर त्याला उलटी होण्याचा अथवा पचनक्रियेवर त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता असते. चक्कर येण्याची भीती असते. कोबरा अथवा करेत या सारखे विषारी सापांचे विष हे धमण्यांवर परिणाम करते. यामुळे रुग्णाला बोलण्यात अडचण येते. बोलण्यास त्रास होतो. श्वास घेण्यास अडचण येते.

साप चावल्यानंतर हे पदार्थ टाळाच

साप चावल्यानंतर काही पदार्थांचं सेवन करणे आरोग्याला अपायकारक ठरते. तेव्हा हे पदार्थ टाळणे आवश्यक आहे.

दारू

चहा अथवा कॉफी पिणे

एनर्जी ड्रिंक

आयुर्वेदिक काढा

तंबाखू खाणे,

धूम्रपान करणे

दूध पिणे

तूप, मध, वा इतर घरगुती उपाय

गोमूत्र अर्क देणे

यापैकी कोणता ही द्रव अथवा अन्नघटक सापावरील रामबाण उपाय नाही. त्याने उलट त्रास वाढू शकतो. साप बिनविषारी असल्याचे निदान झाल्यास अथवा लागलीच उपाय योजना केल्याने प्रकृतीत फरक पडल्यास हलका आहार तोही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतो. साप चावल्यानंतर सर्वात अगोदर रुग्णाला दवाखान्यात, रुग्णालयात नेणे हा आहे. या संपूर्ण कालावधीत रुग्णाने शांत राहणे आवश्यक आहे. रुग्णाला पायी चालत अथवा धावत रुग्णालयात नेऊ नका. अशा दवाखान्यात न्या, जिथे अँटी स्नेक व्हेनम (ASV) उपलब्ध असेल. जिथे साप चावला तिथे चिरा पाडू नका. चित्रपटात दाखवतात तसे विष ओढून थुंकण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, त्या जागेवर बर्फ लावू नका.

सर्वात अगोदर अंगठी, घड्याळ अथवा एकदम फिट कपडे घातले असतील तर ते सैल करा. जिथे साप चावला तो भाग साबणाने अगोदर धुवून घ्या. त्यानंतर ज्या ठिकाणी साप चावला. त्या भागच्या वरील बाजूने खालून घट्ट पट्टी बांधा. त्यामुळे विष पसरणार नाही. पट्टी, रुमाल बांधताना तो एकदम घट्टही बांधू नका आणि एकदम सैलही बांधू नका. तात्काळ चांगल्या रुग्णालयात, तज्ज्ञ डॉक्टरकडे रुग्णाला न्या. वाहनाची व्यवस्था असणे कधीही चांगले. रुग्णाला मोठ्या श्वास घ्यायला सांगू नका.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in