• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य

August 29, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित युनिव्हर्सल वननेस सेलीब्रेशन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी धर्म, मानवता आणि हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवर भाष्य केले. मोहन भागवत म्हणाले की, मी धर्माचा तज्ज्ञ नाही किंवा तुमच्यासारखा धर्माचा जाणकार अथवा अधिकारीही नाही. मात्र, मी अशा समाजात काम करत आहे, जो पारंपरिकरित्या असे मानतो की धर्म वेगवेगळे असले तरी मानवता एकच आहे. सत्य एक आहे आणि मानवता ही त्याच सत्याची निर्मिती आहे.’

पुढे बोलताना भागवत म्हणाले की, ‘आजच्या जगात धर्माची ओळख प्रामुख्याने विविध प्रथा आणि परंपरांमधून होते. धार्मिक शिस्त पाळण्यासाठी आणि दैवी मार्गावर जाण्यासाठी या प्रथा आवश्यक आहेत. मात्र, धर्माचा अंतिम उद्देश काय आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. धर्म आपल्याला सत्याच्या दिशेने घेऊन जातो. भागवत यांनी यावेळी प्रकाशाचे उदाहरण देत सांगितले की, ‘मी प्रकाशाकडे बोट दाखवले, तर तुम्ही माझ्या बोटाच्या दिशेने पाहाल आणि त्यानंतर प्रकाशाकडे पाहाल. मात्र, जर तुम्ही माझ्या बोटाकडेच पाहत राहिलात, तर तुम्हाला कधीच प्रकाश दिसणार नाही. उद्देश काही वेगळा आहे. तो परमसत्य अर्थात दैवी शक्तीचा शोध घेण्याबद्दल आहे, ज्याला आपण वेगवेगळ्या नावांनी संबोधतो.’

मोहन भागवत यांनी सांगितला हिंदू राष्ट्राचा अर्थ

हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘जर तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणायचे असेल, तर सर्व मार्ग एकाच दिशेने जातात आणि प्रत्येक माणसाचा सन्मान आहे, यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. माणसांमध्ये कोणताही भेदभाव नाही. त्यांनी एका कार्यक्रमातील मुस्लिम बांधवांसोबत झालेल्या संवादाचा संदर्भ देत सांगितले की, एका मुस्लिम व्यक्तीने त्यांना विचारले होते की, ‘तुम्ही हिंदू संघटना आहात आणि हिंदू राष्ट्र म्हणता, मग आमचे म्हणजेच मुस्लिमांचे काय? तुम्ही आम्हाला देशाबाहेर काढणार का?’ यावर आपण स्पष्टपणे नाही, हे हिंदुत्व नाही, असे उत्तर दिल्याचे भागवत यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, ‘जर एखाद्या हिंदूला असे वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू राहणार नाही.’

#WATCH | New York, US: At the “One World One Humanity” event, RSS Chief Mohan Bhagwat says, “If any Hindu thinks that there should be no Muslim in Bharat, he will not remain Hindu. If you want to call yourself Hindu, you must believe that all paths are leading to the same goal… pic.twitter.com/e5UYZPppU8

— ANI (@ANI) August 29, 2026

आम्हाला युद्ध थांबवायचे आहे

मोहन भागवत यांनी राजकारणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, समाज आणि देशाच्या हितासाठी धोरणे तयार होण्यापूर्वीच त्यात योग्य बदल घडवून आणणे आणि त्यांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. आम्हाला युद्ध थांबवायचे आहे आणि ही सर्व कामे करायची आहेत. त्यामुळे आम्हाला राजकारणावर सक्रियपणे प्रभाव टाकायचा आहे. एखाद्या टप्प्यावर आपल्याला हे करावेच लागेल असेही भागवत म्हणाले.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in