• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

August 29, 2026 by admin Leave a Comment


भारतीय रेल्वेने आता देशाच्या महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने सर्वात व्यस्त असलेल्या कॉरिडॉरवर सुमारे ११,००० किलोमीटरपर्यंत ट्रॅक अंथरण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेच्या चौपदरी करणाच्या रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्या, वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यात आणि मालवाहतूकीस मोठा फायदा होणार आहे.

रेल्वेच्या या रेल्वे मार्ग वर्तमान काळात देशाच्या एकूण रेल्वे वाहतूकीचा ४१ टक्के भाग वाहून घेत आहे.मात्र हा रेल्वेच्या नेटवर्कचा केवळ १६ टक्के भाग आहे. हे कॉरिडॉर दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि हावडा सारख्या प्रमुख शहरांना जोडला जातो.ज्यामुळे हे कॉरिडॉर प्रवासी आणि मालगाड्या या दोन्हींसाठी महत्वाचा मार्ग बनला आहे.

कोण-कोणते रेल्वेमार्ग सामील होणार ?

  1. दिल्ली – हावडा
  2. हावडा – चेन्नई
  3. चेन्नई – मुंबई
  4.  मुंबई – दिल्ली
  5. दिल्ली – चेन्नई
  6. मुंबई – हावडा
  7. दिल्ली – गुवाहाटी

रेल्वे मंत्र्यांनी फोर-लेन संदर्भात काय सांगितले ?

या रेल्वे मार्गांचे चौपदरीकरण करण्यासाठी रेल्वे मार्ग अंथरण्यासाठी पायाभूत ढाचा विकसित केला जात आहे.या विस्तारासाठी उद्देश्य अतिरिक्त क्षमता पैदा करणे आणि प्रवासी आणि मालवाहतूक वाहतूकीला भविष्यात वाढ करणे सपोर्ट करणे असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतूकीच्या आर्थिक आणि पर्यावरणीय लाभांकडे इशारा केला आहे. ज्यात परिवहनाचा खर्च कमी आणि प्रदुषण मुक्त प्रवास उपलब्ध करणे हा हेतू आहे.

दिल्ली-हावडा आणि दिल्ली-मुंबई कॉरिडॉर सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. दोन्ही मार्गावर एक्सप्रेस ट्रेन दर ताशी १६० किमी वेगाने धावू शकतात. दिल्ली – हावडा रेल्वे मार्गावर दर दिवशी १२० हून अधिक प्रवासी ट्रेन आणि सुमारे १०० मालगाड्या धावतात. हा कॉरिडॉर १,४०० किमी लांबीचा आहे. दिल्ली- मुंबई रेल्वे मार्गावर दर दिवशी ९० हून जास्त प्रवासी ट्रेन आणि सुमारे ८०-८५ मालगाड्या धावतात. हा मार्ग सुमारे १,५०० किमी लांबीचा आहे.

यानंतर हावडा – चेन्नई मार्ग सुमारे १,६५३ किमी लांबीचा आहे. तर दिल्ली – चेन्नई मार्ग सुमारे २,१७४ किमी लांबीचा आहे. चेन्नई-मुंबई मार्ग सुमारे १,२८९ किमी लांबीचा आहे. संपूर्ण नेटवर्कवर दरदिवशी सुमारे २५,००० ट्रेन धावतात. भारतीय रेल्वेने २०२५-२६ दरम्यान ७४१ कोटींहून अधिक प्रवाशांना परिवहनाची सेवा दिली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in