• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shweta Tiwari : छत्रपती संभाजीनगर ते मुंबई.. श्वेता तिवारीला शिवीगाळ करणाऱ्याला राज ठाकरेंच्या कार्यकर्तीने शोधलं, लिहून घेतला माफीनामा

August 28, 2026 by admin Leave a Comment


Shweta Tiwari: ‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या युजरविरोधात श्वेताने काही दिवसांपूर्वी आवाज उठवला होता. तिने काही सोशल मीडिया अकाऊंट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत अशा प्रकारच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले होते. या पोस्टमध्ये तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनासुद्धा टॅग केलं होतं. आता या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. श्वेताला ऑनलाइन शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला असून त्याने तिची लेखी माफीसुद्धा मागितली आहे. महिलांना अशा पद्धतीने अपमानित करणं योग्य आहे का, असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. विशेष म्हणजे, अशा प्रकारची भाषा वापरणारे काही लोक सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याचंही तिने म्हटलं होतं. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर पत्नी, आई किंवा मुलींचे फोटो असतात, तरी दुसऱ्या महिलेला अश्लील शब्द बोलताना त्यांना संकोच का वाटत नाही, असा सवाल श्वेताने केला होता.

तीन दिवसांत आरोपीचा शोध

श्वेताने आता या संपूर्ण प्रकरणाबाबत नवी माहिती शेअर केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, राज ठाकरे यांच्या टीमशी संबंधित एका महिला वकिलांनी तिच्याशी संपर्क साधला. संबंधित व्यक्ती मनसेचा सदस्य नसल्याचंही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. यानंतर या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि अवघ्या तीन दिवसांत श्वेताला त्याचा फोन नंबर तसंच हाताने लिहिलेला माफीनामा देण्यात आला. या कारवाईसाठी श्वेताने संबंधित वकील आणि मनसे टीमचे आभार मानले.

श्वेताने शेअर केलेली पोस्ट-

काय म्हणाली श्वेता?

‘काही दिवसांपूर्वी मी काही स्टोरीज पोस्ट केल्या होत्या. त्यामध्ये काही पुरुष कोणतंही कारण नसताना महिलांविरोधात अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत असल्याचं दाखवलं होतं. मी त्यांची इन्स्टाग्राम अकाउंट्सही शेअर केली होती. कारण अशा प्रकारे वागणाऱ्या लोकांना आपण काहीही करून सुटू शकतो, असा विश्वास वाटता कामा नये, असं मला मनापासून वाटतं. मी राज ठाकरे जी यांच्याकडेही हा प्रश्न उपस्थित केला होता की, त्यांना पाठिंबा देत असल्याचा दावा करणाऱ्या लोकांकडून अशा प्रकारचं वर्तन करणं योग्य आहे का? त्यानंतर लगेचच मनसे पक्षाकडून वकील स्नेहल अडारकर यांनी माझ्याशी संपर्क साधला. संबंधित युजर त्यांच्या पक्षाचा सदस्य नसल्याचं त्यांनी मला सांगितलं. अवघ्या तीन दिवसांत त्यांनी मला त्या व्यक्तीचा फोन नंबर आणि लेखी माफीनामा पाठवला,’ असं श्वेताने लिहिलं आहे.

‘एक-दोन लोकांना पकडून समस्या संपणार नाही’

या घटनेनंतर श्वेताने केवळ स्वतःच्या प्रकरणापुरतं मर्यादित न राहता ऑनलाइन ट्रोलिंगच्या मोठ्या समस्येकडे लक्ष वेधलं. एका व्यक्तीचा शोध घेणं शक्य आहे, मात्र सोशल मीडियाच्या पडद्यामागे लपून महिलांना अपमानित करणारे हजारो किंवा लाखो लोक आहेत, त्यांचं काय, असा सवाल तिने केला. ऑनलाइन गैरवर्तन, विशेषतः महिलांना उद्देशून केली जाणारी सहज शिवीगाळ, ही गंभीर समस्या बनत असल्याचं श्वेताने म्हटलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि टेक कंपन्यांनीही यावर ठोस उपाय शोधण्याची गरज असल्याचं तिने अधोरेखित केलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आम्ही जिंकलो असतो पण तो आडवा आला… शुभमन गिलने कोणाला व्हिलन ठरवलं? सरळ नाव घेत म्हणाला की..
  • Nepal Flood: नेपाळच्या महापुरातून थोडक्यात बचावला अभिनेता; जिथे 12 तासांपूर्वी फोटो काढले, तिथेच आला महाप्रलय
  • रात्र सरताच दिवसा तरंगायला लागले मृतदेह, भूतनाथ तलावात भयंकर प्रकार; 5 दिवसापूर्वी घडलं असं काही की… लोकांमध्ये एकच भीती!
  • ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..
  • IND vs SL: भारतीय संघाचं काम सोप केलं, संधीचं सोनं केलं, तरीही रिकाम्या हाताने घरी जावं लागलं, पडिकलमुळे झाला ‘गेम’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in