
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? यावर सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी सुरु असताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मीडियाशी संवाद साधला. “ते त्यांच्या पद्धतीने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा युक्तीवाद सुरु होईल, तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू. पक्षांतर्गत निवडणुका झाल्या किंवा नाही झाल्या हे सगळ्या जगाला माहित आहे. निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं काम सुरु आहे. हा कोर्टाचा अंतर्गत विषय आहे. त्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही. मी पुन्हा, पुन्हा तेच सांगू इच्छितो की, शिवसेना पक्ष, पदाधिकार, आमदार, नगरसेवक हे मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे विजय आमचा होणार” असा दावा नरेश म्हस्के यांनी केला.
“त्यांच्याकडे इतर मुद्दे नसल्यामुळे निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं काम सुरु आहे. पहिल्यादिवसापासून विधिमंडळ पक्षात फूट पडली. पण राजकीय पक्षात फूट पडली नाही असा जोरदार युक्तीवाद सुरु आहे. विधिमंडळ पक्षात त्यांच्याकडे बहुमत नव्हतं हे सिद्ध झालेलं आहे. राजकीय पक्ष संघटनेत 90 टक्क्यांच्या वर जिल्हाप्रमुख, उपनेते, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. विधिमंडळ पक्षात फूट पडली असं नाहीय. 90 टक्क्यांच्यावर पक्ष संघटना शिंदेसाहेबांसोबत आहे. जिल्हापरिषदा, महापालिका त्या ठिकाणी आमचे जे लोक निवडून आले, कार्यकर्ते संघटनेसोबत आहेत म्हणून निवडून आले” असा दावा नरेश म्हस्के यांनी केला.
Leave a Reply