• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी

July 30, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या, ओढे आणि धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धरणाचे सहा दरवाजे एक फूट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या कोयना धरणातून सुमारे 5,079 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातील वारणा धरण देखील वेगाने भरत असून, धरणाची पाणीपातळी सध्या 84 टक्क्यांवर पोहोचली आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे वारणा धरणातून 7,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

प्रशासनाने कृष्णा, कोयना आणि वारणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्राजवळ जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रात आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, पाण्याची आवक अशीच कायम राहिल्यास कोयना धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गव्हाच्या निर्यातीबाबत घेतला सर्वात महत्वाचा निर्णय
  • मित्र किंवा नातेवाईकाचा ‘लोन गॅरेंटर’ बनताय? आधी वाचा ‘हे’ नियम, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास
  • कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in