• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanjay Raut: प्रत्येक गोष्टीचा हिशोब….ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचा सर्वात मोठा इशारा, त्या खासदारांची औकातच काढली

June 17, 2026 by admin Leave a Comment


Sanjay Raut on Operation Tiger : उद्धव सेनेत मोठ्या भूकंपाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत त्या अनुषंगाने बड्या घडामोडी घडत आहेत. ऑपरेशन टायगरने गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात गोंधळ उडवून दिला आहे. मुंबईत रविवारी मातोश्रीवरील बैठकीत ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व खासदार उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला. पण काल संध्याकाळी मोठ्या घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीत पोहचले. तर उद्धव सेनेचे काही खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून मोठा इशारा दिला आहे. त्यांनी अजून एक मोठे ट्विट करत खासदार राजाभाऊ वाजे आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याविषयी मोठा दावा केला आहे.

नांदेड विमानतळावरील ती इनसाईड स्टोरी काय?

ऑपरेशन टायगरविषयी खासदार संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी नांदेड विमानतळावरील इनसाइट स्टोरीविषयी मोठा दावा केला आहे. नांदेड विमानतळावर एक चार्टड विमान उतरते. ऑपरेशन टायगरच्या नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जाते, असा आरोप राऊतांनी केला आहे. यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती. खासगी विमानाने फिरण्या एवढी किंमत ठाकरे नामा मुळे वाढली, असा जोरदार हल्लाबोल राऊतांनी या खासदारांवर केला आहे. तर त्याचवेळी प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल असा इशारा देत डरपोक कोल्ह्यांच्या पळवा पळविला ऑपरेशन टायगर का म्हणता? असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

नांदेड विमानतळावर एक चार्टड विमान ✈ उतरते
ऑपरेशन 🐅 नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जाते
यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती
खासगी विमानाने फिरण्या एवढी किंमत ठाकरे नामा मुळे वाढली
प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल ।
डरपोक कोल्ह्यांच्या पळवा पळविला
🐅 का म्हणता? pic.twitter.com/ft19myQVD2

— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2026

राजाभाऊ वाजे, आष्टीकरांविषयी मोठे भाष्य

तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये खासदार संजय राऊत यांनी खासदार राजाभाऊ वाजे आणि हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांच्याविषयी मोठे भाष्य केले आहे. “Media ची कमाल आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे दिल्लीत उद्योग समितीच्या बैठकीसाठी निघाले आहेत. इकडे बातम्या वेगळ्याच दाखवत आहेत. हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांनी सांगितले की ते हिंगोलीत आहे, पण काही लोक माझी खोटी सही करू शकतात. आता हे जे लोक आहेत, यांना यावेळी जनता आणि शिवसेना सोडणार नाही, हे नक्की.” असे ट्विट राऊतांनी केले आहे.

थोड्याच वेळात दिल्लीत पत्रकार परिषद

खासदार संजय राऊत, अनिल सावंत यांच्यासह उद्धव ठाकरे यांचे काही खासदार लवकरच दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत सर्व घडामोडींवर मोठे भाष्य समोर येईल. तर कोण कोण खासदार फुटले, त्यामागे कुणाचा हात आहे. कुणाला किती पैसा मिळाला, कुणाला मंत्रिपद देण्यात आले, याविषयीचे आरोप करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. पण या सर्व घडामोडींमुळे दिल्लीसह राज्यात वातावरण तापले आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in