• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?

June 24, 2026 by admin Leave a Comment


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांकडून गेल्या तीन दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संपूर्ण घटनेची माहिती घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी आंदोलकांच्या भावना आणि मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणात रमेश घुले यांचा पुरवणी जबाब नोंदवून घेतला. तसेच हत्या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी नातेवाईक आणि आंदोलकांना दिले. या आश्वासनानंतर रात्री उशिरा आंदोलन स्थगित करण्यात आले.

त्यानंतर विलास घुले यांच्या पार्थिवावर टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या प्रकरणातील चौकशी आणि आरोपींवर होणाऱ्या कारवाईकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याचे नाव समोर आणत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार पोलिसांनी पुरवणी जबाब नोंदवून घेतला असून, त्यातील माहितीची पडताळणी आणि चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ते अजरामर गाणे… सिगारेटचा वास घेऊन गायिले किशोर कुमारांनी गायले, रेकॉर्डिंग पूर्ण होताच…
  • करीना कपूरचं थेट जसप्रीत बुमराहला चॅलेंज; क्रिकेटरने दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही व्हाल खुश!
  • फुटीर गटाचे भवितव्य धोक्यात? दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड… लोकसभा अध्यक्षांचे ठाकरे गटाला भेटीसाठी आमंत्रण…
  • अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का? बड्या नेत्याचं ते तुफान विधान चर्चेत
  • ऋषभ पंतनंतर लखनौने आणखी सहा खेळाडूंबद्दल घेतला मोठा निर्णय, IPL 2027 पूर्वी त्यांना…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in