• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rishabh Pant: पंतचे दिल्ली कॅपिटल्समध्ये परतणं अक्षर पटेलला खटकले? व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा

June 24, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलचा मागील हंगाम संपून आता एकच महिना उलटला आहे. या मागील हंगामापूर्वी एक मोठी ट्रेड डील पार पडली होती. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील ट्रेड डीलने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. संजू सॅमसनबदली राजस्थानने चेन्नईकडून रवींद जडेजा आणि सॅम करनला घेतले होते. आता हंगाम नुकताच संपला आहे आणि लगेचच एक मोठी ट्रेड डील पुन्हा पार पडली. ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला आहे. फ्रँचायझीने त्याला लखनौ सुपर जायंट्सकडून ट्रेड केले आहे आणि कुलदीप यादवला दिल्लीने पंतच्या बदली लखनौकडे ट्रेड केले आहे. आता यानंतर अक्षर पटेल आणि ऋषभ पंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार अक्षर पटेल आणि ऋषभ पंत पाहायला मिळत आहे.

यानंतर, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने पंतचे खेळकरपणे स्वागत केले. या करारानुसार, ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्स सोडून त्याच्या पूर्वीच्या आयपीएल संघ, दिल्ली कॅपिटल्समध्ये 15 कोटी रुपयांना परतला, तर भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव 13.5 कोटी रुपयांना लखनौच्या संघात सामील झाला.

या हाय-प्रोफाईल ट्रेडनंतर, दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये अक्षर पटेलने करार निश्चित झाल्यानंतर पंतसोबत झालेल्या त्याच्या पहिल्या संभाषण सांगितले आहे. अक्षरच्या म्हणण्यानुसार, पंतने त्याला ही बातमी देण्यासाठी वारंवार फोन केला, परंतु अक्षर पटेलने सुरुवातीला त्याचे फोन टाळले कारण तो आपल्या मुलासोबत वेळ घालवत होता. जेव्हा अक्षरने पंतला परत फोन केला, तेव्हा उत्साही पंतने लगेचच सांगितले की, “ठरलंय आता, भाऊ! मी परत येत आहे.”

अक्षर पुढे म्हणाला की, “मला पंतसोबत काहीतरी शेअर करायचे होते, पण फोनवर बोलताना मी ते करो शकला नाही.” व्हिडिओमध्ये, त्याने एका प्रसिद्ध हिंदी म्हणीने पंतचे स्वागत केले, “सुबह का भूला अगर शाम को घर वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते”

गेल्या मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने पंतला विक्रमी 27 कोटी रुपयांना विकत घेतले. मात्र, लखनौसोबतचा पंतचा प्रवास खूपच निराशाजनक होता. 2016 ते 2024 या काळात दिल्ली कॅपिटल्ससोबतच्या त्याच्या पहिल्या कार्यकाळात, पंतने नऊ हंगामांमध्ये एकूण 3,284 धावा केल्या, ज्यामुळे तो फ्रँचायझीचा सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक मागणी असलेल्या खेळाडूंपैकी एक बनला. लखनौ सुपर जायंट्ससोबतच्या त्याच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात पंतने 581 धावा केल्या. कर्णधार म्हणून, ऋषभ पंतने लखनौला 28 सामन्यांमध्ये 10 विजय आणि 18 पराभव मिळवून दिले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Death : केतनला धक्का कुणी दिला? सिया की चेतन? गूढ वाढलं; पोलीसही…
  • ते अजरामर गाणे… सिगारेटचा वास घेऊन गायिले किशोर कुमारांनी गायले, रेकॉर्डिंग पूर्ण होताच…
  • करीना कपूरचं थेट जसप्रीत बुमराहला चॅलेंज; क्रिकेटरने दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही व्हाल खुश!
  • फुटीर गटाचे भवितव्य धोक्यात? दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड… लोकसभा अध्यक्षांचे ठाकरे गटाला भेटीसाठी आमंत्रण…
  • अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का? बड्या नेत्याचं ते तुफान विधान चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in