
लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं, ते विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात असून याच मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 2023 मधील एका ट्विटची आठवण करुन दिली.
राऊत म्हणाले, ‘ज्या विधेयकाचे स्वागत फडणवीसांनी दीड वर्षांपूर्वीच केले होते, ट्वीट करून त्याचे समर्थनही केले, त्यावरून आता पुन्हा राजकारण करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटमधील चुकीच्या विधानांबद्दल आणि खोट्या प्रचाराबद्दल देशाची माफी मागावी,’ अशी मागणी संजय राऊत यांनी केली. इतकेच नाही तर ‘मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी खोटं बोलू नये’ असा सल्लाही दिला.
Leave a Reply