• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्षण…

April 20, 2026 by admin Leave a Comment


लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं, ते विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याच मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. नुकतीच सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकाबाबत स्पष्ट मत मांडलं. इतकेच नाही, तर सत्ताधारी पक्षाला थेट एक प्रश्न विचारला.

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “2023 मध्ये नारीशक्ती विधेयक पास झालं होतं. 2024 च्या लोकसभेत आरक्षण लागू होण्याची शक्यता होती. मग अडीच वर्ष झाली तरी विधेयकाची अंमलबजावणी का केली नाही? आता विशेष अधिवेशन बोलावलं, यातून तुम्हाला काय मिळालं?”, असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, “विषय नसताना विषय बनवत आहेत. विधेयक पडणार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहीत होतं. आम्हाला भाजपच्या दुटप्पीपणाची सवय झाली आहे. 50 टक्के जागा प्रत्येक राज्यात वाढवणार, हे विधेयकात का नाही?”, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रत्येक दिवशी तुमच्या घरी येतात देव? देवाच्या उपस्थितीचे हे आहेत संकेत, आताच लक्षात ठेवा
  • Vladimir Putin : रशियात जो राष्ट्रपतींविरोधात बोलतो तो गायब होतो, पण पहिल्यांच पुतिन या महिला मॉडलसमोर झुकले, सरकारला द्यावं लागलं स्पष्टीकरण
  • Nashik TCS Scandal : ‘ तू रात्री काय करतेस ?’, विवाहीतेला आरोपीचे नको ते प्रश्न आणि… हादरवणारी कहाणी उघड
  • Matka King : काळ्या धंद्यातील इमानदारीचा बादशाह, मटक्याचं साम्राज्य उभं करणारा रतन खत्री कोण?
  • ज्या डॅमवर तो भेटायचा तिथेच स्वत:ला संपवायला गेली, अमरावती सेक्स स्कँडल प्रकरणी खळबळजनक अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in