• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nashik TCS Scandal : ‘ तू रात्री काय करतेस ?’, विवाहीतेला आरोपीचे नको ते प्रश्न आणि… हादरवणारी कहाणी उघड

April 20, 2026 by admin Leave a Comment


नाशिक शहराला हादरवणाऱ्या टीसीएस (TCS) लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाची व्याप्ती प्रचंड वाढली असून या केसमध्ये रोज नवनवे धक्कादायक खुलासे होतात. या केसमध्ये आता रझा मेमनला देखील अटक झाली असून या प्रकरणात चौथ्या सर्व्हायवरनेही साक्ष दिली आहे. “ही गोष्ट आपल्या दोघींमध्येच गुप्त ठेव,” असा अटक करण्यात आलेल्या रझाने पीडितेला सांगितल्याचा दावा तिने केला. पीडितेच्या सांगण्यानुसार, ती 9 ते 6 अशा वेळेत काम करायची. मे 2023 मध्ये सुरवातीच्या इंडक्शन ट्रेनिंगदरम्यान मी ट्रेनिंग रूममध्ये एकटी होती, तेव्हा रझा मेमन जवळ आला आणि त्याने मला नाव, पत्ता वगैरै विचारलं असं पीडितेने सांगितलं.

त्यानंतर त्याने मला एक तोंडी कोडं घातलं आणि त्याचं उत्तर टेक्स्ट मेसेजने पाठवण्याची सूचना देऊन माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. “मी तुला भविष्यातही अशीच कोडी घालत राहीन. मला टीम्सवर उत्तरं पाठवत राहा, पण हे आपल्या दोघांमध्येच गुपित ठेव.” असं तो मला म्हणाला, असा दावा पीडितेने केला. रझा मेमन माझ्या टीममध्ये नव्हता, पण त्यावेळी मला त्याचं वागणं विचित्र वाटलं. मी ऑफिसमध्ये नवीन असल्यामुळे माझ्यावर दडपण आलं आणि मी या घटनेबद्दल कोणालाही सांगितलं नाही असं पीडिता म्हणाली.

अजब वर्तन आणि नको ते स्पर्श

पीडितेच्या सांगण्यानुसार, रझा तिचा पाठलाग करायचा, माझी मर्जी नसतानाही तो मला टच करायचा. मी मॅनेजरकडे तक्रार केली, पण तू एकटी राहू नकोस, सतत ग्रुपमध्ये रहा असा सल्ला फक्त मिळाला. मी जेव्हा एकटी असायचे, रझा मुद्दाम तिथे येऊन माझ्याकडे विचित्र नजरेने पहायचा. माझी इच्छा नसताना तो माझा पाठलाग करायचा आणि जबरदस्तीने अजब-अजब गोष्टी बोलत असायचा असा आरोप पीडितेने केला.

मी भीतीपोटी रझापासून सहज दूर निघून जायचे. पण हे जेव्हा वारंवार होऊ लागलं, तेव्हा मी जून 2023 साली मध्ये माझे क्वालिटी ट्रेनिंग मॅनेजर, जयेश सर, यांच्याकडे रझाच्या विचित्र वागणुकीबद्दल तात्काळ तोंडी तक्रार केली. त्यावेळी, जयेश सर म्हणाले की रझा मेमनचे वागणं यापूर्वीही संशयास्पद होते. त्यांनी मला कधीही एकटे न राहण्याची खात्री करण्याचा सल्ला दिला. जेव्हा मी माझ्या कंपनीच्या टीम लीडर, निताली जगताप, यांच्याशी रझा मेमनबद्दल बोलले, तेव्हा त्यांनी मला नेहमी ग्रुपमध्ये राहण्याचा आणि एकटं राहणं टाळण्याचा सल्ला दिला असं पीडितेने सांगितलं.

मात्र मी जी तक्रार केली, माझ्याबद्दल मनात राग बाळगून, रझा मेमनने जाणूनबुजून द्वेषपूर्ण हेतूने आणि सूडबुद्धीने माझी आणि माझ्या ऑफिसमधील सहकारी अभिषेकची बदनामी केली. त्याने आमची नावे खोट्या पद्धतीने जोडली, आमचे प्रेमसंबंध आहेत अशी अफवा ऑफिसमध्ये पसरवली कीआणि आम्ही अशोक रोडवर एकत्र दिसलो होतो असा दावाही त्याने केला, असं पीडितेने सांगितलं.

रात्री तू इतकी बिझी कशी ?

एवढंच नव्हे तर लग्नानंतरही त्याने आपल्याला टोमणे मारल्याचं पीडिता म्हणाली. ” माझ्या लग्नानंतर, रझा मला टोमणा मारायचा, “रात्री तू इतकी कशात व्यस्त असतेस?” असे प्रश्न तो विचारायच. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिले, त्यानंतर त्याचे, तसेच दानिश आणि तौसीफचे फोन येण्याचे प्रमाण 30 सेकंदांवरून 1 सेकंदावर आले. नोव्हेंबर 2025 मध्ये माझं लग्न झालं. त्या काळात, जेव्हा जेव्हा मी ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर डुलकी घ्यायची, तेव्हा रझा माझ्या लग्नाचा विषय काढून माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायचा.” असा आरोपही पीडितेने केला.

एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा

त्यानंतर तो हसायचा आणि माझ्याकडे घाणेरड्या नजरेने पहायचा. लग्नानंतर रात्री झोपायला हवं. रात्री तुला एवढं काय काम असतं?” असंही तो म्हणायचा, असं पीडितेने सांगितलं. फेब्रुवारी 2026 मध्ये, जेव्हा मला माझ्या नवऱ्यासोबत गोव्याला जायचं होतं, तेव्हा मी रजा मागायला रझा मेमनकडे गेले. त्याने मला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं, आणि हसून विचारलं, “तुम्ही हनिमूनला जात आहात का? तुम्ही दारू पिता का?” जेव्हा मी त्याचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रझा पुढे म्हणाला, “तुम्ही एखाद्या थंड ठिकाणी जायला हवं. फिरण्यासाठी तीच सर्वोत्तम ठिकाणं आहेत.” असं पीडितेने नमूद केलं.

माझ्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाबद्दलच्या ह्या कमेंट्स मला खूप अश्लील आणि अत्यंत अपमानकारक वाटल्या. मी त्याला सातत्याने टाळत होते, त्यामुळेच सूडाच्या भावनेने पेटलेल्या रझा मेमनने, कृष्णा रजेवर असताना, त्याचे सहकारी दानिश आणि तौसीफ यांना सिस्टीम सेटिंग्जमध्ये फेरफार करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सिस्टीम अशी सेट केली की, स्टँडर्ड प्रोटोकॉलनुसार, साधारणपणे दर 30 सेकंदांनी येणारे इनकमिंग कॉल्स आता दर 1 सेकंदाला येऊ लागले. यामुळे माझ्यावरील कामाचा ताण वाढला, असा आरोपही पीडितेने केला.

तक्रार करूनही कारवाई नाहीच

यानंतर, मी रझाबद्दल, प्रमुखांकडे तक्रार केली. पण त्यावर त्या असं म्हणाल्या की, “तुला प्रसिद्धीच्या झोतात का राहायचं आहे?.” अखेर या परिस्थितीला कंटाळून मी आमच्या प्रमुख, सुश्री अश्विनी चैनानी यांच्याकडे गेले पण त्यांनी सातत्याने रझा मेमन, दानिश आणि तौसीफ यांचा बचाव केला असा दावा पीडितेने केला आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कोणतीहीकारवाई करण्याऐवजी, माझ्यासोबतच्या त्याच्या लज्जास्पद वर्तनाचं त्यांनी समर्थन केलं. “तुला प्रसिद्धीच्या झोतात का यायचं आहे? सोडून दे हा विषय. हे प्रकरण इथेच संपू दे,” असे म्हणत त्यांनी माझ्या तक्रारी फेटाळून लावल्या असा आरोप पीडितेने लावला आहे,

खरं सांगायचं तर त्यांनी अशा प्रकारे, प्रत्यक्षात रझाचीच बाजू घेतली. त्यामुळे, मी अश्विनी मॅडमकडे तक्रार करणे थांबवलं. यामुळे रझा मेमनची हिंमत वाढली आणि आमच्या कार्यालयातील इतर महिला कर्मचाऱ्यांचा छळ कायम होत राहिला. एवढंच नव्हे तर, पीडितेने गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेली एक घटनाही सांगितली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, मी साडी नेसले होते, ते पाहून शाहरूख माझ्याकडे एकटक बघत होता “आज तू अगदी वेगळी दिसत आहेस. आपण कुठेतरी बाहेर जाऊया का?” असा सवालही त्याने विचारल्याचा आरोप पीडितेने केलाय

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Baba Vanga : 2027 या राशींच्या लोकांसाठी ठरणार वादळी, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं, बाबा वेंगांची हादरवणारी भविष्यवाणी
  • वैभव सूर्यवंशीला नेमकं काय झालं? खिन्न मनाने एकांतात बसला आणि सहकारी खेळाडूंनी काढली समजूत Video
  • राज कपूर यांच्यामुळे या अभिनेत्रीचे संपले करिअर, दिलेत अनेक सुपरहिट चित्रपट, आज तिच्या दोन्ही मुली आहेत सुपरस्टार
  • Manushi Chhilar : निळाशार सागर, बिकिनीमध्ये मादक अदा, मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या मालदीवमधल्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
  • Amravati | अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली संवेदनशील माहिती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in