• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amravati | अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली संवेदनशील माहिती

April 20, 2026 by admin Leave a Comment


अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज या मुख्य आरोपीला अटक केली असून, या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ज्या आठ मुलींचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते, त्यापैकी एका १६ वर्षीय मुलीने स्वतःचा जबाब नोंदवला आहे. यावेळी तिने पोलिसांना संबंधित प्रकरणातील संवेदनशील माहिती दिल्याचे अमरावती पोलिसांनी सांगितले. यावेळी माध्यमांसमोर बोलताना पोलिसांनी इतर पीडितांनाही समोर येऊन तक्रार करण्यास सांगितले आहे. तसेच, त्यांच्या ओळखीची गोपनीयता राखली जाईल असेही सांगितले.

आरोपी आयाजने आतापर्यंत आठ तरुणींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ पुरावे हाती लागले आहेत. मात्र, प्राथमिक तपासात हा आकडा अधिक मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून १८० पेक्षा अधिक तरुणींचे शोषण केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे दिसून आले.

या प्रकरणातील पीडित तरुणी परतवाडा, अमरावती आणि नागपूर परिसरातील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एक आरोपी एमआयएम पक्षाशी संबंधित कार्यकर्ता असल्याची माहितीही पुढे आली आहे



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अनेक मुली सिंगल का राहतात? कारण ऐकून व्हाल थक्क
  • US Iran War : ज्याची भीती होती तेच घडलं, अखेर चीनची एन्ट्री, अमेरिकेनं इराणच जहाज जप्त करताच थेट…, मोठी खळबळ
  • IPL 2026: अजिंक्यचा वाईट काळ, कॅप्टनच्या नावावर सर्वात खराब रेकॉर्ड, काय झालं?
  • डायबिटीज असणाऱ्यांनी आंबा खावा की नाही? तज्ञ काय सांगतात जाणून घ्या…
  • Video: प्रीति जिंटाने मिठी मारताच अर्शदीप सिंगची अशी होती रिएक्शन, मोहम्मद शमी पाहात राहिला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in