
डायबिटीज असणारे रुग्ण अनेकदा फळे खाणे टाळतात. कारण फळे खाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते असे म्हटले जाते. पण उन्हाळ्याचा सिझन सुरु झाला की सर्वांनाच आंबे खायचे असतात. पण आंबा खाल्याने खरच डियबिटीस वाढतो का? चला जाणून घेऊया तज्ञांकडून…
इंटिग्रेटिव्ह लाइफस्टाइल एक्सपर्ट ल्यूक कुटिन्हो (Luke Coutinho) यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये सांगितले की, आंब्याला घाबरण्याची गरज नाही, तर समजूतदारपणे खाण्याची गरज आहे. जर तुमची साखर नियंत्रणात नसेल किंवा तुम्ही गरजेपेक्षा जास्त आंबे खात असाल, विशेषतः रात्री, तर ते नुकसानकारक ठरू शकते. पण जर तुम्ही संतुलन राखले तर आंबा खाणे बंद करु नका.
आंब्यामध्ये नैसर्गिक साखर नक्कीच जास्त असते, पण त्यात अनेक पोषक घटकही असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात मँगिफेरिन नावाचा एक घटक आढळतो, ज्याला अँटी-डायबिटिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. म्हणजे योग्य पद्धतीने खाल्ल्यास हे फळ शरीराला नुकसान करण्याऐवजी फायदाही देऊ शकते.
ल्यूक कुटिन्हो सल्ला देतात की, तुम्ही आंबा सुका मेवा, बिया किंवा दही सोबत खाऊ शकता. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक वाढत नाही आणि ग्लुकोज हळूहळू सोडले जाते. हाच प्रकार आंबा खाणे अधिक सुरक्षित बनवतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मात्रा आणि वेळ याकडे लक्ष देणे. एकदम जास्त प्रमाणात आंबा खाणे योग्य नाही. जर तुमचे शरीर सहन करत असेल तर एक छोटा भाग खाता येईल. साखर वाढल्यासारखे वाटल्यास मात्रा आणखी कमी करावी. उशिरा रात्री आंबा खाणेही योग्य मानले जात नाही, कारण त्या वेळी शरीराची प्रक्रिया मंद होते.
हेही समजून घेणे गरजेचे आहे की, प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. म्हणून आपल्या शरीराला समजून घ्या आणि त्यानुसार निर्णय घ्या. आंबा खाल्ल्यानंतर साखर वाढत असेल तर ती मर्यादित करणे जास्त चांगले. डायबिटीजमध्ये आंबा पूर्णपणे वर्जित नाही, पण बेफिकीरपणा मात्र अजिबात चालणार नाही. योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने तुम्ही या फळाचा आनंद घेऊ शकता.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)






Leave a Reply