
राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती देत 1 मेपासून कडक अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र दिनापासून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल.
मोटार परिवहन विभागाच्या विविध प्रादेशिक कार्यालयांमार्फत चालकांची तपासणी केली जाईल. यात चालकांना मराठी वाचता आणि लिहिता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. आवश्यक ज्ञान नसल्यास संबंधितांचे परवाने रद्द होऊ शकतात.
या निर्णयामुळे विशेषतः मराठी न बोलणाऱ्या चालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मंत्री सरनाईक यांनी स्थानिक भाषेचा आदर करणे आणि व्यवसायासाठी ती शिकणे आवश्यक असल्याचे सांगितले.
Leave a Reply