• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanjay Raut : ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजलं ना…आप पक्षाच्या फुटीवर राऊतांची खरमरीत टीका… म्हणाले, अचानक हे लोक होलसेलमध्ये….

April 25, 2026 by admin Leave a Comment


Sanajay Raut on Raghav Chadha-AAP-BJP: आप पक्षातील सात खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजधानातील या घाडमोडींनी एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व खासदार पंजाबमधून आलेले आहेत. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी तोंडसूख घेतले. त्यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला नरक का म्हणाले हे आता समजलं ना, अशी बोचरी टीका त्यांनी या पक्ष फुटीवर केली. तर आम्ही सामान्य नागरीक आहोत, आम्हाला पुन्हा तुरुंगात टाकले तरी घाबरणार नाही असे आवाहन ही त्यांनी भाजपला दिले.

मग गुंडांच्या पक्षात कसे गेले?

राज्यसभेतील सात खासदार जे पंजाबमधून राज्यसभेवर आलेत. त्यात राघव चड्ढा, संजय मित्तल, संजय पाठक अजून काही नावं आहेत. भारतीय जनता पार्टी ही देशात राजकारण करत आहे. भाजप निर्लज्ज झाली आहे. तिने लाज सोडली आहे. राघव चड्ढासारखे काही लोक माझेही मित्र होते. कालपर्यंत राघव चड्ढा हे भाजपला गुंडांचा पक्ष म्हणत होते. भाजप हा गुंड आणि भ्रष्ट लोकांचा पक्ष आहे हे राघव चड्ढा सुद्धा म्हणत होते. संजय मित्तल आणि संजय पाठक आणि इतरही खासदार म्हणत होते. आता हे सर्व लोक होलसेलमध्ये गुंडांच्या पक्षात गेले. आपने संजय मित्तल यांना राघव चड्ढा यांच्याऐवजी राज्यसभेत पक्षाचा उपनेता केले, त्याने मला पण धक्का बसला. तेव्हा मित्तल आनंदी होते. अचानक त्यांच्या काही संस्थांवर ईडीची कारवाई झाली. ईडीचे छापे पडले आणि राजकीय भूकंप झाला याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बामतीची अपडेट होत आहे…



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बिनडोकपणाचा कळस… मुलीवर वाईट नजर नको म्हणून बापाने थेट… जे काही घडलं त्याने अमरावती पुन्हा हादरली
  • त्याने मला घट्ट पकडलं, कार सुरु केली आणि…, मुंबईच्या रस्त्यांवर मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
  • Sanjay Dutt Wife Manyata : चित्रपटाच्या घोषणेचा कार्यक्रम पण अचानक काय झालं, संजू बाबाच्या पत्नीला इवेंटमध्ये सर्वांसमोर कोसळलं रडू
  • सावधान! ITR मध्ये चुकीची माहिती भरली तर 200 टक्के दंड, आयकर विभागाचे नवीन नियम लागू
  • Bageshwar Baba: चार मुलं पैदा करा आणि एक… RSS चा उल्लेख करत हिंदू धर्मीयांना धीरेंद्र शास्त्री यांचे मोठे आवाहन काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in