• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बिनडोकपणाचा कळस… मुलीवर वाईट नजर नको म्हणून बापाने थेट… जे काही घडलं त्याने अमरावती पुन्हा हादरली

April 25, 2026 by admin Leave a Comment


अमरावतीच्या परतावाडा येथील लैंगिक शोषणाच्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडालेली असतानाच आणखी एका घटनेने अमरावती पुन्हा हादरली आहे. मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून जन्मदात्या बापाने चक्क मुलीचं टक्कल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयानक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, मुलीचं टक्कल करणाऱ्या बापाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अमरावतीच्या वरूड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून एका बापाने अजबच प्रताप केला आहे. त्याने चक्क आपल्या 16 वर्षीय मुलीचे ट्रिमरने केस कापून तिला टकलं करून घरात बसवलं. त्यामुळे या मुलीला धक्का बसला असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकाराने हतबल झालेल्या मुलीने वरूड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली असून पोलिसांनी तिच्या आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केस कापून मानसिक छळ केल्याची तक्रार या मुलीने केली होती. या घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीला महिला आणि बालविकास आयुक्तालयाच्या शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृहात पाठवण्यात आलं आहे.

मुलाविरोधात तक्रारीचा तगादा

या मुलीकडे एक मुलगा वाईट नजरेने पाहत होता. त्याचा मुलीच्या वडिलांना प्रचंड राग येत होता. त्यामुळे या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दे, असा तगादा या मुलीच्या आईवडिलांनी मुलीकडे लावला होता. पण मुलीने तसं केलं नाही. आईवडिलांचं ऐकलं नाही. त्यामुळे या मुलाने आपल्या मुलीकडे वाईट नजरेने पाहू नये म्हणून तिच्या बापाने चक्क मुलीचं टक्कल केलं.

दरम्यान, या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या सुचिता बर्वे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुलगी जेव्हा आली तेव्हा तिचं टक्कल होतं. आईसोबत तिचे सावत्र वडील राहत आहेत. तिचे आई वडील असुरक्षित होते. त्यांना वाटत आपल्या मुलीकडे कोणी बघू नये. पण त्यांनी केलेल हे कृत्य अमानवीय आहे. 8 दिवस झाले मुलगी आमच्याकडे आहे. ती जास्त बोलत नाही. तिचा सध्या आईवडिलांवर राग नाही. आम्ही आता तिचं पुनर्वसन करणार आहोत. तिच्या डोक्यावर काही परिणाम होऊ नये यासाठी आम्ही काम करणार आहोत. आता सध्या आई-वडिलांसोबत तिचा संबंध नाही, असं सुचिता बर्वे यांनी सांगितलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bhojpuri Actress Fees : बॉलिवूडमधल्या हिरोइनपेक्षा भोजपुरी इंडस्ट्रीतल्या या 5 अभिनेत्री जास्त Fee घेतात का?
  • रोज सकाळी उपाशीपोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या तज्ञाकडून
  • Sudhir Mungantiwar | ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, गुप्त बैठकीची गरज…
  • IPL Slapgate: ‘कानशि‍लात मारल्याप्रकरणातून हरभजनने कमावले 1 कोटी’, श्रीसंतने आरोप करत केलं ब्लॉक
  • Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, आजचा ताजा दर काय? वाचा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in