• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रोज सकाळी उपाशीपोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या तज्ञाकडून

April 25, 2026 by admin Leave a Comment


बदलत्या जीवनशैलीत आपले आरोग्य तंदुरुस्त राहावे यासाठी आरोग्यदायी आहार घेत असतो. अशातच जेवणाची चव वाढवणारा लसूण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. विशेषतः जर तुम्ही लसूण दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ला, तर अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळू शकतो. काही लोक त्यांच्या आहारात लसणाचा समावेश करतात. कारण त्यांचा असा विश्वास आहे की लसणाच्या सेवनाने हृदयाच्या आरोग्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये मदत होते. त्यामुळे आता बरेच लोकं सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याची सवय लावत आहेत. पण सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने शरीरावर खरोखरच काही परिणाम होतो का? की हा केवळ एक गैरसमज आहे?

तुम्ही जर ही सवय अंगीकारण्याचा विचार करत असाल तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात.

आयुर्वेद तज्ञ सांगतात की, लसूण पोषक तत्वांनी समृद्ध असून शरीराला अनेक फायदे देतो. लसणामध्ये असलेले ॲलिसिन शरीरासाठी निश्चितच फायदेशीर आहे, परंतु त्याचे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. हृदयाच्या आरोग्यापासून ते शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यापर्यंत म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन हे सर्व गोष्टींसाठी उपयुक्त ठरते. चला त्याचे इतर फायदे जाणून घेऊया.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त

तज्ञांच्या मते दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कारण लसणामध्ये जीवाणूनाशक आणि विषाणूनाशक गुणधर्म असतात, जे संसर्गाशी लढण्यास मदत करतात. यामुळे तुम्ही हंगामी आजारांपासून सुरक्षित राहता.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी तुम्ही दररोज लसणाच्या दोन पाकळ्यांचे सेवन करू शकता. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहते.

पचनसंस्थेत सुधारणा करते

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे गॅस, आम्लपित्त आणि अपचन यांसारख्या पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते, परिणामी तुमची पचनसंस्था मजबूत होते.

शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास उपयुक्त

लसूण शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतो. तो यकृताच्या कार्याला साहाय्य करतो ज्यामुळे शरीर आतून शुद्ध होते आणि तुम्हाला अधिक उत्साही वाटते.

वजन नियंत्रणात मदत करते

लसूण चयापचय क्रिया वेगवान करण्यास मदत करतो, ज्यामुळे कॅलरी अधिक चांगल्या प्रकारे जळतात. तसेच, तो भूक नियंत्रित करण्यासही मदत करतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मारुति सुझुकीचा ‘मिशन 2030’ प्लॅन तयार, स्वस्त SUV सह लाँच करणार 5 जबरदस्त कार
  • केएल राहुलचं दीडशतक, 150 धावा करणारा पहिला भारतीय, अभिषेक शर्माचा रेकॉर्ड ब्रेक
  • ‘भारताकडे फक्त राष्ट्र म्हणून नव्हे तर संस्कृती म्हणून पहा’, IIT 2026 ग्लोबल कॉन्फरन्समध्ये सदगुरूंचे विधान
  • जगातले असे काही देश जेथे केवळ 4 दिवस लोक करतात काम, इतर दिवस काय करतात ?
  • केएल राहुलने पंजाब किंग्सविरुद्ध ठोकलं झंझावाती शतक, 100 धावा करताच नोंदवले इतके सारे विक्रम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in