• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केएल राहुलने पंजाब किंग्सविरुद्ध ठोकलं झंझावाती शतक, 100 धावा करताच नोंदवले इतके सारे विक्रम

April 25, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी स्वीकारली. दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात पंजाब किंग्सच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. संघाच्या 28 धावा असताना पाथुम निस्संका 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणा यांनी पंजाब किंग्सच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं. त्यामुळे त्यांना नेमका टप्पा कुठे टाकायचा तेच कळेना. केएल राहुलला या सामन्यात दोन जीवदान मिळाले. त्या जीवदानाचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. केएल राहुलचा पहिला झेल 12 धावांवर असताना सुटला, त्यानंतर 10 षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पुन्हा संधी बाद करण्याची संधी मिळाली आणि हुकली. केएल राहुलने अर्धशतक 26 चेंडूत पूर्ण केलं. त्यानंतर 21 चेंडूत शतक पूर्ण केलं.

केएल राहुलने शतकी खेळीसह आयपीएल शतकांच्या यादीत टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आहे. विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेत 8 शतकं ठोकली आहेत. त्यानंतर 7 शतकांसह जोस बटलर दुसऱ्या स्थानी आहे. तर सहा शतकांसह केएल राहुलने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. तर पाच शतकांसह संजू सॅमसन पाचव्या स्थानावर आहे.

केएल राहुलने पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आमि दिल्ली कॅपिटल्ससाठी प्रत्येकी दोन शतकं ठोकण्याचा मान मिळवला आहे. तर तीन वेगवेगळ्या फ्रेंचायझीसोबत आतापर्यंत क्विंटन डीकॉक आणि संजू सॅमसन याने शतक ठोकलं आहे. पण केएल राहुल प्रत्येक फ्रेंचायझीसोबत दोन शतकं ठोकली आहेत.

केएल राहुलची ही वेगवाने शतकी खेळी ठरली आहे. यापूर्वी त्याने 2022 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ब्रेबॉर्नवर 56 चेंडूत शतक ठोकलं होतं. केएल राहुल दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ऋषभ पंतचा नाबाद 128 धावांचा विक्रम मोडला आहे. त्याने 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ही खेळी केली होती.

दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा मान केएल राहुल आणि नितीश राणा यांना मिळाला आहे. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी केली आहे. यापूर्वी 2011 मध्ये वीरेंद्र सेहवाग आणि डेविड वॉर्नर यांनी 146 धावांची भागीदारी केली होती. हा विक्रम आता मोडीत निघाला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6, 6, 6, 6..! वैभव सूर्यवंशीने प्रफुल हिंगेला दाखवला इंगा, पहिल्याच षटकात घेतला बदला
  • भोंदू मनोहर भोसलेचे नवी मुंबई कनेक्शन, पंचतारांकित हॉटेलमध्ये नको तो प्रकार, VIP लोकांना…
  • GK : 3 खंडांनी वेढलेला एकमेव महासागर, भारताशी आहे खास नातं
  • Chanakya Niti : आयुष्यात यश मिळवायचंय? मग चाणक्यांच्या या तीन नियमांचं पालन कराच
  • IPL 2026, DC vs PBKS: पंजाब किंग्सने विक्रमी 265 धावा गाठल्या, दिल्लीच्या गोलंदाजांना धुतलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in