• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6, 6, 6, 6..! वैभव सूर्यवंशीने प्रफुल हिंगेला दाखवला इंगा, पहिल्याच षटकात घेतला बदला

April 25, 2026 by admin Leave a Comment


Vaibhav Sooryavanshi vs Praful Hinge: आयपीएल 2026 स्पर्धेच्या 36व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा सामना वैभव सूर्यवंशी आणि प्रफुल हिंगे यांच्यातला असल्याने सर्वांचं लक्ष लागून होतं. कारण मागच्या सामन्यात या दोघांचा सामना झाला तेव्हा पहिल्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशीला तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यावेळी संघ सहकाऱ्यांना पहिल्याच चेंडूवर बाद करेन असं बोलून दाखवल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकाने नाराजी व्यक्त केली होती. असं बोलून दाखवलं होतं, तर पुढच्या सामन्यात काय होतं पाहूयात. त्यामुळे या सामन्यात महत्त्व वाढलं. हा सामना सुरू झाला आणि पहिल्याच षटकात वैभव सूर्यवंशीचा सामना प्रफुल हिंगेशी झाला.

आयपीएल स्पर्धेत दुखापतीनंतर परतलेल्या कर्णधार पॅट कमिन्सने पहिलं षटक प्रफुल हिंगेच्या हाती सोपवलं. कारण वैभवला झटपट बाद करेल असं पॅट कमिन्सला वाटलं. पण भलतंच घडलं. यावेळी वैभव सूर्यवंशी आक्रमकपणे सामना करण्यास सज्ज झाला होता. त्याची प्रचिती पहिल्याच षटकात प्रफुल हिंगेला आली. प्रफुल हिंगेच्या पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी यशस्वी जयस्वाल समोर होता. त्याने एक धाव काढली आणि वैभवला स्ट्राईक दिली. त्याने दुसऱ्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू हुकला आणि निर्धाव गेला. त्यानेतर तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार मारले. त्याने सलग चार चेंडूत चार षटकार मारले. त्याने पहिल्या सामन्यात शून्यावर बाद केल्याचा एक प्रकार सूड घेतला.

वैभव सूर्यवंशीने पहिल्या षटकात चार षटकार मारून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या फलंदाजाने पहिल्या षटकात चार षटकार मारले आहेत. वैभव सूर्यवंशीच्या आधी असा कारनामा कोणीच केलेला नाही. यापूर्वी 2009 मध्ये नमन ओझाने केकेआरविरुद्ध पहिल्या षटकात 3 षटकार मारले होते. वैभव सूर्यवंशीने 15 चेंडूत अर्धशतकही पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीने तिसऱ्यांदा 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण करण्याची किमया साध्य केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्हाला पण आहे का ही सवय? तर मग साप चावण्याचा धोका 50 टक्के अधिक वाढतो, ही चूक कधीही करू नका
  • RR vs SRH : वैभवचं शतक-ध्रुवचं अर्धशतक, हैदराबादसमोर 229 धावांचं आव्हान, राजस्थान रोखणार?
  • 0… 100! वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादकडून केली वसुली, शतकी खेळीसह नोंदवला विक्रम
  • चेहरा होईल नितळ, नजरही होईल तीक्ष्ण, व्हिटामिन्स- ई ने भरपूर 5 शाकाहारी फूड्स पाहा
  • RR vs SRH : वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड, 15 वर्षीय फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in