
ओपनर वैभव सूर्यवंशी याचं शतक आणि ध्रुव जुरेल याने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 36 व्या सामन्यात जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबादसमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 228 धावा केल्या. राजस्थानसाठी वैभव आणि ध्रुव व्यतिरिक्त डोनोवन फरेरा याने सर्वाधिक धावा केल्या. तर हैदराबादसाठी एशान मलिंगा याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील आठवा सामना आहे. हैदराबादने सलग 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे राजस्थान हैदराबादला विजयी चौकार लगावण्यापासून रोखणार का? यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.
Leave a Reply