• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुण्यात असहाय महिलेची रस्त्यातच प्रसुती, स्थानिक मदतीला धावले, सरकारी रुग्णालयावर होतोय गंभीर आरोप

April 25, 2026 by admin Leave a Comment


पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातील निर्माण प्लाझा परिसरात एका गरीब गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रसूती कळा अचानक तीव्र झाल्याने ही महिला रस्त्यातच खाली बसली आणि काही क्षणातच तिने बाळाला जन्म दिला. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मदत केली. विशेष म्हणजे,डॉ.सुनिता पोटे आणि स्थानिक महिलांनी साड्या आणि स्कार्फच्या सहाय्याने सुरक्षित वातावरण तयार करत प्रसूतीसाठी मदत केली. यानंतर या महिलने सरकारी रुग्णालयावर गंभीर आरोप केला आहे.

या गरीब महिलेच्या प्रसुतीसाठी डॉ.सुनिता पोटे यांनी प्रसंगावधान राखत मदत करीत तत्परतेने नवजात बाळावर उपचार केले. सुरुवातीला बाळ श्वास घेत नसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, योग्य उपचारांनंतर बाळाने रडायला सुरुवात केली आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर आई आणि बाळाला तातडीने मीरा नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले असून दोघांचीही प्रकृती आता स्थिर आहे.

दरम्यान, या घटनेने एक गंभीर प्रश्न समोर आला आहे. संबंधित महिला पारधी समाजातील असून, तिने सरकारी दवाखान्याकडून भेदभाव झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. आमचा पारधी समाज असल्यामुळे आम्हाला सरकारी दवाखान्यात घेतले जात नाही. वारंवार खाजगी दवाखान्यात जाण्यास सांगितले जाते. त्यामुळेच माझ्यावर रस्त्यावरच प्रसूती होण्याची वेळ आल्याचे तिने म्हटले आहे. माझं बाळ श्वास घेत नव्हतं.आमचा जीव जायची वेळ आली, तरी आम्हाला मदत मिळाली नाही असा आरोप तिने केला आहे.

दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

महिलेच्या या आरोपांमुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.आदिवासी आणि पारधी समाजातील नागरिकांना समान वागणूक का मिळत नाही ? हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकीकडे शिरूरकरांनी दाखवलेली माणुसकी कौतुकास्पद ठरत असताना, दुसरीकडे सरकारी यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : वैभवचा शतकासह धमाका, युवा फलंदाजाचे 2 वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण 5 विक्रम
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये जोरदार चुरस, पहिल्या स्थानी कोण?
  • CSK vs GT Live Streaming : गुजरातसमोर चेन्नई विरुद्ध पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान, यला आर्मी जिंकणार?
  • LSG vs KKR Live Streaming : लखनौ-केकेआरची वाईट स्थिती, रविवारी कोण जिंकणार?
  • RR vs SRH : इशानच्या खेळीसमोर वैभवचं शतक व्यर्थ, हैदराबादचा सलग चौथा विजय, राजस्थानचा 5 विकेट्सने धुव्वा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in