• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

0… 100! वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादकडून केली वसुली, शतकी खेळीसह नोंदवला विक्रम

April 25, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं होतं. मागच्या सामन्यात राजस्थानचा पराभव झाला होता आणि वैभव सूर्यवंशीही शून्यावर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात सर्व चित्र उलटं झालं. वैभव सूर्यवंशीने सळो की पळो करून सोडलं. (Photo: Rajasthan Royals Twitter)

वैभव सूर्यवंशीला मागच्या सामन्यात प्रफुल हिंगेने पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. मात्र यावेळी त्याला एकाच षटकात चार षटकार मारले. तसेच 36 चेंडूत 12 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. त्याने 103 धावांची खेळी केली आणि बाद झाला. (Photo: Rajasthan Royals Twitter)

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील वैभव सूर्यवंशीचे हे दुसरं शतक आहे. यापूर्वी आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्सविरुद्ध शतक ठोकलं होतं. त्यानंतर या पर्वात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतक ठोकलं. मागच्या पर्वात 35 चेंडूत, तर या पर्वात 36 चेंडूत शतकी खेळी केली. (Photo: Rajasthan Royals Twitter)

आयपीएलमधील तिसरे सर्वात वेगवान शतक होते. या स्पर्धेतील दुसऱ्या सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही सूर्यवंशीच्या नावावर आहे. सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध 30 चेंडूंमध्ये हे शतक झळकावले होते. (Photo: Rajasthan Royals Twitter)

वैभव सूर्यवंशी टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा सर्वात तरुण खेळाडूही ठरला. 15 चेंडूत अर्धशतक झळकावणारा वैभव सूर्यवंशी टी20 क्रिकेटमध्ये वयाच्या 15व्या वर्षी 1000 धावा पूर्ण करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. (Photo: Rajasthan Royals Twitter)

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात दोन शतके झळकावणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही अनकॅप्ड खेळाडूला जमलेली नाही. (Photo: Rajasthan Royals Twitter)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुण्यात असहाय महिलेची रस्त्यातच प्रसुती, स्थानिक मदतीला धावले, सरकारी रुग्णालयावर होतोय गंभीर आरोप
  • इराणसोबत चर्चा रद्द होताच डोनाल्ड ट्रम्प संतापले, अधिकाऱ्यांना थेट आदेश… जगाची धाकधूक वाढली
  • 8 वेतन आयोगात सरकारी शिक्षकांना पगारात मोठी वाढ ? शिक्षक संघटनांनी ठेवला प्रस्ताव
  • मोठी बातमी! इराण-अमेरिकेतील चर्चा पुन्हा फिस्कटली, जगाला पुन्हा युद्ध पहावे लागणार? पाकिस्तानात काय घडलं?
  • तुम्हाला पण आहे का ही सवय? तर मग साप चावण्याचा धोका 50 टक्के अधिक वाढतो, ही चूक कधीही करू नका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in