• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

त्याने मला घट्ट पकडलं, कार सुरु केली आणि…, मुंबईच्या रस्त्यांवर मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

April 25, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री नेहा पेंडसे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. फक्त मराठीच नाही तर, हिंदी कलाविश्वात देखील तिने मोठं नाव कमावलं आहे. पण एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आहे. नेहा म्हणाली, मुंबईत तिच्यासोबत अत्यंत भयानक घटना घडली आहे. एके दिवशी अभिनेत्री सकाळी – सकाळी रस्त्यावर जॉगिंग करण्यासाठी निघाली होती. तेव्हा एका पुरुषाने तिच्या समोर कार थांबवली, तिला रस्ता विचारु लागला…

पण रस्त्यावर गोंगाट असल्यामुळे पुरुष काय विचारत आहे, हे नेहाला कळलं नाही. म्हणून अभिनेत्री त्याच्या कारच्या दिशेने पुढे गेली. कारण अभिनेत्रीला त्याची मदत करायची होती… पण त्या पुरुषान अचानक अभिनेत्रीला घट्ट पकडलं आणि तिला काही कळताच कार चालवण्यास सुरुवात केली… नेहा म्हणाली, ‘माझ्यासोबत काय होत आहे, हे मला कळतंच नव्हतं…’ सकाळी – सकाळी असं कोण करेल? असा प्रश्न अभिनेत्रीच्या मनात उभा राहिला.

हे सर्व इतकं अचानक घडलं की, नेहाला काही कळणं देखील कठीण झालं होतं. पण तिने हार मानली नाही.. तिने स्वतःला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले… अभिनेत्री तात्काळ स्वतःच्या कारच्या चाव्या काढल्या आणि त्या पुरुषाच्या गाडीवर मारण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने कार थांबलली…

आयुष्यात आलेल्या सर्वात भयानक क्षणांबद्दल अभिनेत्री म्हणते, ‘माझ्या हातात माझ्या गाडीच्या चाव्या होत्या. तेव्हा माझ्याकडे क्रुझ गाडी होता, जिचा मोठा असा ब्लॉक रिमोट असतो… मी रिमोट त्याच्या गाडीवर मारण्यास सुरुवात केली… त्याच्या गाडीच्या काचांना लागलं.. आवाज झाल्याने पुरुषाने ब्रेक मारला तेव्हा माझी अवस्था फार वाईट झालेली. माझ्या मनात भीती होती त्याने गाडी वळवली तर मी काय करु?’, ‘तो पुरुष एका सेकंदासाठी थांबला आणि तेथून निघून गेला.. पण तो एक सेकंद माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक क्षण होता…’, असं देखील अभिनेत्री नेहा पेंडसे म्हणाली.

नेहा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘भाभीजी घर पर है’ मालिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bhojpuri Actress Fees : बॉलिवूडमधल्या हिरोइनपेक्षा भोजपुरी इंडस्ट्रीतल्या या 5 अभिनेत्री जास्त Fee घेतात का?
  • रोज सकाळी उपाशीपोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या तज्ञाकडून
  • Sudhir Mungantiwar | ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, गुप्त बैठकीची गरज…
  • IPL Slapgate: ‘कानशि‍लात मारल्याप्रकरणातून हरभजनने कमावले 1 कोटी’, श्रीसंतने आरोप करत केलं ब्लॉक
  • Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, आजचा ताजा दर काय? वाचा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in