
33 वर्षानंतर खलनायक पुन्हा एकदा पडद्यावर परतणार आहे. बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त पुन्हा एकदा बल्लू बनून धमाका करणार आहे. संजय दत्तने 'खलनायक रिटर्न्स' या आपल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या फिल्मचा टीजर सुद्धा आला आहे.
'खलनायक रिटर्न्स' मध्ये संजय दत्त आधीच्या खलनायक पेक्षा जास्त घातक आणि क्रूर अवतारात दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. 24 एप्रिलला एका खास इवेंटमध्ये 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा करण्यात आली. या दरम्यान संजय दत्तची पत्नी मान्यता इमोशनल झाल्याचं दिसलं.
मान्यता आपले अश्रू थांबवू शकली नाही. चित्रपटाच्या इवेंटमध्ये ती सर्वांसमोर रडली. सोशल मीडियावर मान्यता रडल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यात ती डोळे पुसताना दिसतेय. संजय पत्नीला संभाळताना दिसतो.
इवेंटमध्ये संजय दत्तने मान्यताचं कौतुक केलं. “मी माझ्या पत्नीचे आभार मानतो. मान्यता दत्त नेहमीच माझ्या आयुष्यात माझी ताकद बनून राहिली. मी जेव्हा पडतो, तेव्हा एक हात आहे, जो कॉलर पकडून मला उभं करतो” पत्नी बद्दल बोलताना संजू बाबा पण भावूक झालेला.
मान्यताने पण संजय दत्तचं कौतुक केलं. मला वाटतो तो एक चांगला पिता आहे. तो आयुष्याला आता वेगळ्या दृष्टीने बघतो. आयुष्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्याची आक्रमकता आता कमी झालीय. तो शांत झालाय असं मान्यता म्हणाली.




Leave a Reply