
आठवड्याभरापूर्वी शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांपैकी एक, खा. संजय दिना पाटील हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ माजला, संजय राऊतांनी त्यावर लेटर बॉम्ब टाकला. संजय दिना पाटील याच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे हे देखील नाराज झाले. तेच संजय दिना पाटील आता पुन्हा चर्चेत आले आहेत, मात्र ते अगदीच चुकीच्या कारणामुळे. माध्यमांशी संवाद साधताना संजय दिना पाटील हे भडकले, संतापले आणि रागाच्या भरात त्यांची जीभ चांगलीच घसरली. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवर अरेरावी केली तसेच त्यांना शिवीगाळही केली. पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय पाटील यांनी अतिशय अर्वाच्च भाषा वापरली. एवढंच नव्हे तर त्यांनी पत्रकारांना मारण्याची भाषा करत धमकीही दिली.
पत्रकारांना मारण्याची धमकी
मुंबईत संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊतांनी केलेले आरोप यावर त्यांनी उत्तर दिलं. शिंदे आपल्यावर नाराज नाही तर त्यांनी शाबासकी दिली असं सांगत संजय दिना पाटील हे विविध विषायंवर बोलले. मात्र बराच वेळ बोलून झाल्यावर ते निघत असताना एका पत्रकाराने त्यांना आणखी राजूल पाटील, नक्की कुठे यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. रागाच्या भरात बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी माध्यमांना शिवीगाळ करत थेट धमकी दिली.
माझं हे बघू नका तुम्ही, अती करताय. ए भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर नाहीतर मी विसरून जाईन की मी खासदार आहे तरतुम्ही काय आहे ते… अशा शब्दात संजय दीना पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी शांततेची भूमिका स्वीकारत हो, हो असं म्हटलं, आम्ही चाललोय असं सांगितलं, तरीही संजय दिना पाटील यांची मग्रुरी, त्यांचा माज कायम होता.
पुन्हा पुन्हा शिवीगाळ
मी इज्जत करतो, इज्जत करा सांगतोय परत XXXXXXXX… असं म्हणत त्यांनी पत्रकारांसमोरच शिव्यांची लाखोली वाहिली. मी इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उभं करतोय तुम्हाला, जेवायला देतोय . काय, उगाच त्यांच्याकडे जाल. परत आला ना तर मारून पाठवणार तुम्हाला, जे बोलायचं, जे लिहायचं ते लिहा अशी थेट धमकीही संजय दिना पाटील यांनी दिली.
एवढंच नव्हे तर, लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे… कमिशनरकडे जाऊन कम्प्लेंट करा अशी मग्रुरीही त्यांनी दाखवली. इज्जत करतो, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला XXX घुसताय… अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची.. बोललीय ना ती.. सागितलं ना सर्व… त्याने काही बोलू दे.. अरे काही बोलू दे.. तुझ्या XXXXX XXXX गेलं असं म्हणत, रेकॉर्ड करा आणि सांगा , तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार ..अशा शब्दांत संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच रोष पसरला असून विरोधकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
Leave a Reply