• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sandeep Kshirsagar : आमदार संदीप क्षीरसागर नाराज, अचानक नेमकं काय घडलं? बीडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

August 15, 2026 by admin Leave a Comment


बीडच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर नाराज झाल्याचे समोर आलं आहे. बीडमधील शासकीय ध्वजारोहणासाठी निमंत्रण न मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी काल शासकीय व वसतीगृहाच्या उद्घाटनासाठी निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर नाराज झाले आहेत. क्षीरसागर यांच्या नाराजीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

बीडमधील शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याने आमदार क्षीरसागर नाराज झाले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना क्षीरसागर म्हणाले, ‘ गेल्यावेळी कंकालेश्वरच्या उद्घाटनासाठी मला निमंत्रण दिले नव्हते. मी इथला लोकप्रतिनिधी असतानाही मला निमंत्रण नव्हते. यामध्ये राजकारण होत आहे. DPDC मध्ये आम्ही बोगस बिलं काढल्याच्या तक्रारी केल्या, त्यातंही काहीच केले नाही. अजितदादांनी जे-जे लोकांना शब्द दिले होते. ते आता त्यांनी पाळले पाहिजेत. ते जेवढ्या दुःखात आहेत. तेवढ्या दुःखात आम्हीही आहोत’.

मी नाराज आहे, कारण…: क्षीरसागर 

‘विकास कामांबाबतीतही निधी मिळत नाही. मी नाराज आहे, का नाराज होऊ नये? बीड शहराला दहा दिवसाला पाणी मिळत होते. ते आता वीस दिवसाला मिळत आहे. वेळ पडल्यास आता आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरणार. पीए झरे आणि देशमुख यांच्या म्हणण्यावरुन इथला कारभार होतोय. सुनेत्रा ताईंनी पीएंच्या मनावर कारभार करू नये. दादा आणि पंकजाताईंच्या काळातला कारभार पाहिला, सामाजिक कामे आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर ते मार्गी लावायचे. इथे कोणीही डेरा घातला तरी त्याला काही अर्थ नाही, असं म्हणत त्यांनी आमदार विजयसिंह पंडित यांना टोला लगावला. ‘मी विरोधी पक्षातला आमदार असताना दादांचे बॅनर लावले. मला आज सुध्दा ध्वजारोहणासाठी कुठलंही निमंत्रण नाही, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. संदीप क्षीरसागर यांच्या नाराजीची चर्चा  बीडच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. क्षीरसागर यांच्या नाराजीवर आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय प्रतिक्रिया देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in