• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Salman Khan : भाईजानची क्रिप्टीक पोस्ट, व्हिडीओ पाहून चिंतेत आलेल्यांना सलमान खान म्हणतो…

July 25, 2026 by admin Leave a Comment


Salman Khan : अभिनेता सलमान खान याचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झालेला. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी भाईजानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर अभिनेत्याने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत चाहत्यांच विचारलं की, ‘तुमची प्रकृती कशी आहे?’, यावर चाहत्यांनी देखील कमेंटचा वर्षाव केला.. आता देखील सलमान खान याने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे.

सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट करत अभिनेत्याने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. फोटो पोस्ट करत भाईजान कॅप्शनमध्ये म्हणतो, ‘सलमान खान घाबरला… हममम जो डर गया वो मर गया…’, सलमान खानच्या या नव्या पोस्टवर देखील चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

 

सांगायचं झालं तर, रविवारी जेव्हा सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा सर्वांनाच त्याची अवस्था पाहून आश्चर्याचा मोठा धक्का बसला. सलमानला कोणता आजार झाला की काय, त्याची तब्येत बरी आहे का नाही, असे सवाल चाहत्यांनी उपस्थित केले. पण त्यानंतर स्वतःचं काही फोटो पोस्ट करत सलमान खान याने चाहत्यांना दिलासा दिला.

या गंभीर आजारांचा सामना करतोय सलमान खान

एकदा खुद्द सलमान खान यानेच स्वतःच्या प्रकृतीबद्दल मोठा खुलासा केलेला. सलमान खान तीन मोठ्या आजारांचा सामना करत आहे.  ब्रेन एन्युरिझ्म, एवी मालफॉर्मेशन आणि ट्राइजेमिनल न्यूराल्जिया अशी या आजारांची नावं आहेत. यापैकी दोन आजार मेंदूशी संबंधित आहेत, तर तिसऱ्या आजारामुळे चेहऱ्याच्या नसांमध्ये वेदना होतात. तरी देखील वयाच्या 60 व्या वर्षी सलमान खान चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतो. एवढंच नाही तर, अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या  प्रतिक्षेत देखील चाहते असतात.

सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘मातृभूमी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एवढंच नाही तर,  एका दाक्षिणात्य सिनेमातून देखील सलमान खान चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचं नाव SVC63 असं आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत असणार आहे.

 

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in