• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य

August 24, 2026 by admin Leave a Comment


गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : माझगावमध्ये काल गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान एक घटना घडली. माझगाव मोरया गणपती मंडळाची गणेश आगमन मिरवणूक सुरु असताना अंड फेकण्याचा प्रकार झाला. कॉनटिनेन्टल हाईट्स टॉवर या इमारतीमधून हा अंड फेकण्याचा प्रकार झाला. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते खवळले. या घटनेमुळे माझगावमध्ये वातावरण तापलं होतं. मिरवणुकीवर अंड आणि दगड फेकल्याचा आरोप माझगाव मोरया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावर एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेते उपसभापती सचिन अहिर बोलले आहेत. “माझगाव मध्ये करणारा एक व्यक्ती पण समाज बदनाम होतोय, हिम्मत कशी होते? अशा घटना पुढच्या काळात होण्याची शक्यता आहे, सणांना गालबोट लावण्याचा प्रकार होऊ शकतो त्यामुळे कायदा हाती घेऊ नका” असं आवाहन सचिन अहिर यांनी केलं आहे.

हिंदुत्वाचा आक्रमकतेने प्रचार करणारे भाजपे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या शैलीत अंडी फेकणाऱ्यांना इशारा दिला आहे. पुढे ईद, मोहरम आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दात त्यांनी इशारा दिलाय. दरम्यान सचिन अहिर यांनी आज वरळी, महालक्ष्मी धोबीघाट परिसराचा आढावा घेतला. “बरीच विकास कामं प्रलंबित आहेत, जी पूर्ण झालेली नाहीत. या मतदार संघात विकासाला चालना मिळायला हवी. कोळीवाड्याते रस्ते खराब आहेत. वरळीत रस्त्यात खड्डे आहेत ते बुझवण्याचं काम केलं पाहिजे” असं सचिन अहिर यांनी म्हटलय.

हिंदू सणांना प्रोत्साहन देण्याचा आमची भूमिका

“आदित्य ठाकरे कदाचित ज्या रस्त्यांवर खड्डे नाहीत तिथे गेले असतील, मी जिथे खड्डे पडलेत तिथे पाहणी केली आहे” असं सचिन अहिर म्हणाले. “जे मराठी रिक्षाचालकाला मारहाण करतात त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. समाजात कटूता माजवण्याचं हे काम आहे. संजय राऊत यांना काय म्हणायचंय, मराठी नाही आली तरी चालेल ही भूमिका शिवसेनेनं स्पष्ट करावी. याची जर अंमलबजावणी आम्ही करत असू तर गैर काय ? मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ८०० जणांना मोफत सेवा आम्ही देतोय, चाकरमानी कोकणात जातोय. हिंदू सणांना प्रोत्साहन देण्याचा आमची भूमिका आहे” असं सचिन अहिर म्हणाले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
  • 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर
  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in