• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ruturaj Gaikwad : ऋतुराजचा पहिल्याच सामन्यातील शतकासह मोठा कारनामा, द्रविड-गंभीरच्या विक्रमाची बरोबरी

June 9, 2026 by admin Leave a Comment


इंडिया ए टीम श्रीलंका दौऱ्यात अपेक्षित सुरुवात करण्यात यशस्वी ठरली. इंडियाने ट्राय सीरिजमधील पहिल्या सामन्यात श्रीलंका ए विरुद्ध अवघ्या 8 धावांनी विजय मिळवला. भारताने श्रीलंकेसमोर 278 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेनेही विजयी धावांचा पाठलाग करताना जबरदस्त बॅटिंग केली. त्यामुळे श्रीलंकेच्या विजयाची शक्यता अधिक होती. मात्र भारताने शेवटच्या टप्प्यात कमाल केली आणि सामना 8 धावांनी जिंकला. भारताने श्रीलंकेला 48.5 ओव्हरमध्ये 269 रन्सवर ऑलआऊट केलं. ऋतुराज गायकवाड भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ऋतुराजने केलेल्या शतकी खेळीमुळे भारताला 277 धावांपर्यंत पोहचण्यात मदत झाली. ऋतुराजला त्याने केलेल्या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच ऋतुराजने या शतकासह 2 माजी दिग्गज फलंदाजांच्या विक्रमाची बरोबरी केली.

ऋतुराजचं शतक आणि गंभीर-द्रविडच्या विक्रमाची बरोबरी

ऋतुराजने श्रीलंकेविरुद्ध 114 बॉलमध्ये एकूण 101 धावा केल्या. ऋतुराजने या दरम्यान 112 चेंडूत शतक पूर्ण केलं. ऋतुराजने या शतकादरम्यान 3 षटकार आणि 6 चौकार लगावले. ऋतुराजच्या लिस्ट ए कारकीर्दीतील हे 21 वं शतक ठरलं. ऋतुराजने यासह माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविड आणि गौतम गंभीर या दोघांच्या विक्रमांची बरोबरी केली. द्रविड आणि गंभीर या दोघांनीही लिस्ट ए क्रिकेटमध्ये प्रत्येकी 21-21 शतकं झळकावली होती. इंडिया ए टीमला ट्राय सीरिजमधील साखळी फेरीत आणखी 3 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे ऋतुराजकडे आणखी 1 शतक करुन द्रविड आणि गंभीर या दोघांना लिस्ट ए क्रिकेटमधील शतकांबाबत मागे टाकण्याची संधी आहे.

ऋतुराज गायकवाड याची इंडिया ए टीममध्ये आधी निवड करण्यात आली नव्हती. मात्र मालिकेच्या काही दिवसांआधी रियान पराग याच्या जागी ऋतुराजला संधी देण्यात आली. तसेच ऋतुराजला उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली. ऋतुराजने शतक करुन त्याला संधी देण्याचा निवड समितीचा निर्णय योग्य ठरवला.

ऋतुराजचा शतकी तडाखा

1⃣0⃣1⃣ Runs
1⃣1⃣4⃣ Deliveries
6⃣ fours and 3⃣ Sixes

Vice-captain Ruturaj Gaikwad is adjudged the Player of the Match for his fabulous century 👏🫡

Scorecard ▶ https://t.co/nwKDTkg1ZY

#TriNationSeries | #SLAvINDA

(Player image Credits: Sri Lanka Cricket). pic.twitter.com/pwSdE4zp5W

— BCCI (@BCCI) June 9, 2026

सर्वाधिक लिस्ट ए शतकं

सचिन तेंडुलकर : 60 शतकं

विराट कोहली : 59 शतकं

रोहित शर्मा : 37 शतकं

दरम्यान लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम हा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. तर दुसऱ्या स्थानी विराट कोहली आणि तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा विराजमान आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सांगता काय? टोमॅटोच्या झाडांना हलवल्यावर भरघोस उत्पादन? काय आहे तज्ज्ञांचे मत?
  • शाहरुख खान अन् प्रीती झिंटानंतर आता ‘या’ अभिनेत्याची पण क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोणत्या संघाचा मालक बनला?
  • आता बाईकसारखे पुढे झुकून चालवणार कार! डच कंपनीने सादर केली अनोखी ‘ॲपेक्स पोझिशन’ ड्रायव्हिंग स्टाईल
  • Kangana Ranaut : केतन अग्रवाल प्रकरणात कंगना राणौतची सियाच्या आई-वडिलांबाबत वेगळी विचार करायला भाग पाडणारी भूमिका
  • Indian Railways : ट्रेनमधून सामान नेण्याबाबतचे नियम बदलले, आता या वस्तूंना मिळाली मंजूरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in