
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 36 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदाबाद आमेसामने आहेत. राजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघांचा हा आठवा सामना आहे राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि हैदराबाद चौथ्या स्थानी आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादने या सामन्यात राजस्थान विरुद्ध बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
हैदराबादचा कर्णधार बदलला
सनरायजर्स हैदराबादचा 19 व्या मोसमातील सातव्या सामन्यानंतर कर्णधार बदलण्यात आला आहे. हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे इशान किशन याला हंगामी कर्णधार या पदावरुन हटावं लागलं आहे. पॅटच्या कमबॅकसह हैदराबादचं नशिब पालटलं आहे. हैदराबादला इशान कॅप्टन असताना पहिल्या आणि सलग 7 सामन्यांत टॉस गमवावा लागला होता. मात्र पॅट येताच हैदराबादच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. पॅटने चेजिंगचा निर्णय घेतला आहे.
पॅटला दुखापतीमुळे या मोसमातील पहिल्या 7 सामन्यांना मुकावं लागलेलं. मात्र आता पॅटच्या एन्ट्रीमुळे हैदराबादच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल झाला आहे. पॅटच्या एन्ट्रीमुळे दिलशान मधुशंका याला बाहेर व्हावं लागलं आहे. तर मराठमोळ्या प्रफुल याचा हर्ष दुबे याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. तर राजस्थानने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (विकटेकीपर), अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कॅप्टन), शिवांग कुमार, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे आणि एशान मलिंगा.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कॅप्टन), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, नांद्रे बर्गर आणि ब्रिजेश शर्मा.
Leave a Reply