• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद

July 22, 2026 by admin Leave a Comment


नीट आंदोलनावरुन विरोधी पक्षातच दोन गट पडल्याचं चित्र आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये मतभेद दिसून आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या बाहेर अखिलेश यादव आणि केसी वेणूगोपाल यांच्यात जोरदार वादावादी झाली. काँग्रेस आणि भाजपमध्ये डील झाली आहे, असा दावा अखिलेश यादव यांनी केला. लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित झालेलं. केसी वेणूगोपाल यांनी असं वक्तव्य केलं म्हणून सभागृहाबाहेर अखिलेश यादव यांनी त्यांना जाब विचारला. अखिलेश यादव त्यावेळी म्हणाले की, “राजीनामे नंतरही दिले जाऊ शकतात. सर्वप्रथम विद्यार्थ्यांबरोबर जी क्रूरता झाली, त्यावर उत्तर हवं आहे”

नीट पेपर लीक आणि 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाई विरोधात बोलण्याची परवानगी दिली जात नाहीय म्हणून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव चिडलेले. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसचे केसी वेणूगोपाल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना बोलण्याची परवानगी दिली. त्यानंतर अखिलेश यांनी सरकार आणि काँग्रेसमध्ये काही डील झालीय का? असा प्रश्न उपस्थित केला.

विद्यार्थ्यांनबरोबर जी क्रूरता झाली, त्याचं उत्तर हवं

काँग्रेस खासदार केसी वेणूगोपाल यांना सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचं वक्तव्य आवडलं नाही. सभागृह स्थगित होताच त्यांना अखिलेश यादव दिसले. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यावेळी अखिलेश यादव त्यांना म्हणाले की, राजीनामे नंतरही घेतले जाऊ शकतात. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनबरोबर जी क्रूरता झाली, त्याचं उत्तर हवं आहे. त्याआधी मंगळवारी आम आदमी पार्टीने सुद्धा प्रश्न विचारलेला की, राहुल गांधींना पीएम निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याची परवानगी कशी मिळाली?. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन कमकुवत करण्यासाठी भाजपने राहुल गांधी यांनी पीएम निवासस्थानाबाहेर आंदोलनाची परवानगी दिली असा आरोप संजय सिंह यांनी केला.

चर्चा नियमानुसारच होईल

त्यानंतर आज अखिलेश आणि काँग्रेसमध्ये वाद झाला. दुपारी दोन वाजता संसदेचं काम सुरु झाल्यानंतरही गदारोळ सुरु राहिला. काँग्रेस अडून बसलेली की, आधी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, त्यानंतर संसदेत चर्चा होईल. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजीजू यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. पण चर्चा नियमानुसारच होईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘एकत्र जगलो, आता एकत्रच मरू…’; मरण समोर, पण आजारी नवऱ्याची साथ सोडण्यास नकार, रमायाची कहाणी डोळ्यात पाणी आणेल
  • Apple iPhone: पहिल्या फोल्डेबल आयफोनसह अजून एक मोठं सरप्राईज, ॲपलचा मोठा धमाका!
  • Rahul Gandhi : राहुल गांधींचा भाजप-RSS वर जोरदार हल्लोबाल; जन्म ते मृत्यू…देशात दलितांसोबत भेदभाव, दिले हादरवणारे पुरावे
  • जरांगेंची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, मागण्या चुकीच्या… गुणरत्न सदावर्ते यांची जोरदार टीका
  • मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप? शासनाकडून आकेडवारीच समोर, उपोषणापूर्वी मनोज जरांगेंचा तो मोठा आक्षेप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in