• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Sharma Retirement : रोहित शर्मा याला गंभीर आणि आगरकरांचा तो मेसेज, विराट कोहली धक्क्यात, थेट सामना सुरू असतानाच..

July 17, 2026 by admin Leave a Comment


भारतीय संघ वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. मात्र, यादरम्यानच एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ज्यामुळे फक्त क्रिकेटप्रेमीच नाही तर भारतीय क्रिकेट संघालाही मोठा झटका बसला. या स्पर्धेला एका वर्षाचा अवधी शिल्लक असून टीम बांधणी सुरू आहे. रोहित शर्मा याने हा वर्ल्डकप खेळण्याची इच्छा बोलून दाखवली. त्याच्याकडून त्याकरिता सरावही सुरू होता. मात्र, निवड समितीने त्याला मोठा झटका दिला. भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवट असण्याची शक्यता आहे. त्याला दक्षिण अफ्रिकेत होणाऱ्या वनडे मालिकेत संधी मिळणार नाही.  यादरम्यान सामना सुरू असतानाच काही घडामोडी अशा मैदानात घडल्या, ज्यामुळे रोहित शर्मा याच्यासोबतच विराट कोहली यालाही मोठा धक्का बसला. दोघांचाही चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसत आहे.

गाैतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्याकडून मिळालेल्या मेसेजनंतर वातावरणच बदलून गेले. एका अहवालानुसार, भारतीय निवड समितीने 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 चा भाग नसणार आहे. इंडिया टीमचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी रोहित शर्माला तू भविष्यातील योजनांचा भाग नसल्याचे कळवल्याची माहिती मिळतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohan Milke (@cric7xict)

इंग्लंडविरुद्ध रोहित शर्मा याने 26 धावा केल्या. विराट कोहली याने 65 धावा केल्या. बाद झाल्यानंतर रोहित शर्मा हा मैदानातील गॅलरीत बसला होता. त्यापूर्वीच त्याला अजित आगरकर आणि गाैतम गंभीर यांचा निरोप मिळाला होता. बीसीसीआयच्या निरोपानंतर रोहित शर्मा शांत बसला होता. रोहित शर्मा याला मिळालेल्या मेसेज विराट कोहली याच्यापर्यंतही पोहोचला. रोहित शर्मा याच्याशेजारी विराट कोहली शांत आणि दु:खी चेहऱ्याने बसला.

त्याचा चेहरा गंभीर होता. बरेच काही सांगून गेला. व्हिडीओमध्ये विराट कोहली शांत बसला असून एक टक बघताना दिसत आहे. रोहित शर्माला मिळालेल्या मेसेजनंतर विराट कोहली याच्या चेहऱ्याचा रंग उतरल्याचे स्पष्टपणे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अजित आगरकर देखील इंग्लंडमध्ये आहेत. व्हिडीओमध्ये विराट कोहली काहीतरी विचार करताना दिसत आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in