• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Sharma: 19 वर्षापूर्वीचा तो दिवस, आणि… पद्मश्री पुरस्कार मिळताच रोहित शर्मा भावुक

June 24, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारताला 2024 चा टी-20 विश्वचषक व 2025 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारे कर्णधार रोहित शर्मा यांना, गेल्या दोन दशकांतील भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात रोहित शर्मा यांचा सन्मान केला. रोहित शर्मा यांनी भारतासाठी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना 23 जून 2007 रोजी खेळला होता. पजानेवारीमध्ये हे पद्मश्री पुरस्काराची नावे घोषित केली होती. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आता यानंतर पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर रोहितने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टची आता जोरदार चर्चा होत आहे.

रोहित शर्माने पोस्टमध्ये लिहिले की, “23 जून हा दिवस खूप जादू घेऊन येतो. 19 वर्षांपूर्वी, भारताची कॅप मिळण्याने या सगळ्याची सुरुवात झाली होती. आज, यात आणखी एका अभिमानास्पद अध्यायाची भर पडली आहे.” रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. रोहितने तिन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाजी आणि कर्णधारपद या दोन्हीमध्ये प्रभावी कामगिरी दाखवली आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून करून, रोहितने 2013 मध्ये सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली. रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने 19 सप्टेंबर 2007 रोजी टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि नोव्हेंबर 2013 मध्ये कसोटी पदार्पण केले.

रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहितने 67 कसोटी, 285 एकदिवसीय आणि 159 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 12 शतकांसह 4.301 धावा, एकदिवसीय सामन्यांमध्ये 33 शतके आणि 62 अर्धशतकांसह 11,720 धावा आणि टी20 मध्ये 5 शतके आणि 32 अर्धशतकांसह 4,231 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक द्विशतके (3) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (653) करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील 264 धावांच्या सर्वोच्च खेळीचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

धोनीनंतर रोहित हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कप, टी-20 विश्वचषक 2024 आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीतही पोहोचला होता.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष
  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…
  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in