• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Pawar: दिल्लीत काहीतरी शिजतंय? देवेंद्र फडणवीसांबाबत रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

August 2, 2026 by admin Leave a Comment


भाजपविरुद्ध शिवसेना असा सामना सुरू आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात काम करत आहेत. राज्यातील विविध मतदारसंघ आणि शहरात या दोन्ही पक्षातील वाद दिसून आला आहे. तर मुंबईतही एकमेकांविरुद्ध काम करताना आपण बघितलं आहे, असा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्याचवेळी फडणवीस हे दिल्लीत जाणार या दाव्यावरही त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. खासदार संजय राऊतांच्या वक्तव्याचीच ते री ओढताना दिसून आले.

फडणवीसांना दिल्लीत येण्याचा आग्रह

गेल्या काही दिवसात फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय मंत्री होतील असा दावा सातत्याने करण्यात येत आहे. त्यात खासदार संजय राऊत हे आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षातील नेते सुद्धा असाच दावा करत आहेत. रायगडमध्ये शेकापच्या कार्यक्रमाला आलेले असताना आमदार रोहित पवार यांनी हाच सूर आळवला. दिल्लीत काहीतरी झालं आहे. फडणवीसांना दिल्लीत येण्यासाठी आग्रह करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणी खाण्याचे दात वेगळे आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. आमचा लोकशाहीवर तसा त्यांना रिलवर विश्वास आहे. आधीचे पंतप्रधान पत्रकारांशी संवाद साधायचे, असा टोमणाही त्यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधानांना हाणला.

EVM बाबत आंदलन करणार

तरुण आता EVM बाबत आंदलन करणार आहेत. पेपरवर मतदान व्हावे अशी युवकांची मागणी आहे, असे रोहित पवार म्हणाले. तर काँग्रेसचे पटोले यांचे दुधाने पाय धुवून पूजा करण्यात आल्याच्या मुद्दावर त्यांनी ते काय केले हे पहावे लागेल, प्रकरण समजून घ्यावे लागेल अशी प्रतिक्रिया दिली. दिपके यांची महायुतीमधील विशेषतः शिंदे सेनेतील दोन नेत्यांनी भेट घेतली. मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी दिपके यांची भेट घेतली. त्यावर प्रतिक्रिया देताना ते स्वतः हून भेटायला गेले होते की त्यांना शिंदेंनी पाठवले होते हे बघावे लागेल असे उत्तर पवार यांनी दिले.

शेकाप वर्धापनदिनी पद्मश्री भिकल्या दिंडा यांचा गौरव

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध तारपा वादक तथा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदिवासी समाजातील भिकल्या दिंडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in