• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Richest Chief Minister: कोणाची 1400 कोटी तर कोणाची 900 कोटी संपत्ती… देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?

July 30, 2026 by admin Leave a Comment


देशातील वेगवेगळ्या राज्यांचा गाडा हाकणारे मुख्यमंत्री हे कायमच चर्चेत असतात. त्यांचे राहणीमान, खानपान आणि संपत्ती तर नागरीकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. आता देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोणत्या राज्याचे आहेत आणि कोणते मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे हे समोर आले आहे. वाचा सविस्तर…

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (डीआर)ने एक अहवाल सादर केला आहे. या यादीमध्ये 1400 कोटींहून अधिक संपत्ती असलेले आणि काही लाख रुपये संपत्ती असलेल्या देशातील मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.

द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील सर्व 31 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती 3,660 कोटी रुपये असून एका मुख्यमंत्र्याची सरासरी संपत्ती 118.07 कोटी रुपये इतकी आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1413.8 कोटी रुपये आहे.

त्यांच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे एन. चंद्राबाबू नायडू यांचा नंबर आहे. त्यांची संपत्ती 931.83 कोटी रुपये आहे.

तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 648.85 कोटी रुपये आहेत.

अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. ते चौथ्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 332.56 कोटी रुपये आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचे वार्षिक उत्पन्न 184.53 कोटी रुपये असून ते सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक आहे.

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 55.24 लाख रुपये आहे.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांचा देखील संपत्ती कमी असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत दुसरा क्रमांक आहे. त्यांची एकूण संपत्ती 85.87 लाख रुपये आहे.

त्यापाठोपाठ राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (1.46 कोटी रुपये) यांचा समोवेश आहे. नंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. त्यांची एकूण संपत्ती 1.54 कोटी आहे.

सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्याच्या यादीच पाचव्या क्रमांकावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.97 कोटी रुपये आहे.

मध्य प्रदेशचे मोहन यादव यांची संपत्ती 42.04 कोटी आहे. आसामचे हिमंता बिस्वा सरसा यांची संपत्ती 35.16 कोटी आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती 13.27 कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. उर्वरित 21 मुख्यमंत्र्यांची संपत्ती 2 कोटी ते 42 कोटी रुपयांच्यामध्ये आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गव्हाच्या निर्यातीबाबत घेतला सर्वात महत्वाचा निर्णय
  • मित्र किंवा नातेवाईकाचा ‘लोन गॅरेंटर’ बनताय? आधी वाचा ‘हे’ नियम, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास
  • कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in