• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RE-NEET परीक्षेत हिजाबवरुन वाद पेटला, विद्यार्थींनी म्हणाली, ही तर माझी ओळख आहे…

June 21, 2026 by admin Leave a Comment


देशातील NEET UG 2026 परीक्षेच्या पेपर फुटीनंतर ही परीक्षा आज रविवारी २१ जून रोजी देशभरात पुन्हा घेण्यात आली. यावेळी अममेर येथे RE-NEET परीक्षेदरम्यान गोंधळ उडाला आहे. येथील सावित्री गर्ल्स स्कूल परीक्षा केंद्रावर एक मुस्लीम विद्यार्थीनीने बुरखा आणि हिजाब असा पेहराव करीत परीक्षा केंद्रावर प्रवेश केला तेव्हा तेथे बुरख्यावर पर्यवेक्षकांनी आक्षेप घेतल्याने विद्यार्थीनी आणि पालकांनी प्रचंड नाराजी झाली.

ब्यावर येथून परीक्षा देण्यासाठी पोहचलेली उमेदवार उम्मे कुलसुम हिच्या बुरखा आणि हिजाबवर परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. विद्यार्थीनीने सांगितले की बुरखा माझी ओळख आहे. एनटीएचे नियम क्रमांक ८ मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की कोणालाही धार्मिक पोशाख करुन यायचे असेल तर त्यांनी तपासणीच्या आधी यावे, आम्ही सर्व सहकार्य केले तरी आम्हाला अडवण्यात आले आहे.

या विद्यार्थिनीचे वडील मोहम्मद आलिम यांनी देखील परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांच्या वागणूकीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. तिने आधीही दोन वेळा बुरखा परीधान करुन परीक्षा दिलेली आहे. तेव्हा कोणताही आक्षेप घेतला नाही. एनटीएने परवानगी दिलेली आहे. येथे तर केंद्रावर रोखले गेले आहे. आम्ही संपूर्ण तपासणी साठी तयार आहोत. परंतू आमची मुलगी बुरखा हटवून परीक्षा देणार नाही.

वाद वाढलेला पाहून केंद्र प्रशासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घातले. अधिकाऱ्यांनी त्या विद्यार्थिनीला आणि तिच्या वडीलांना समजवून शांत केले. त्यानंतर एनटीएच्या मार्गदर्शक सुचनानुसार त्या तरुणीचे संपूर्ण तपासणी आणि बायोमेट्रिक व्हेरीफिकेशन प्रक्रीया पूर्ण केली आणि तिला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला.

सरकार आणि एनटीएच्या सर्व निर्देशांचे पालन

या प्रकरणात अझमेर जिल्हा कलेक्टर लोक बंधू यांनी सांगितले की अझमेर जिल्ह्यातील सर्व १५ केंद्रांवर नीटची परीक्षा शांततेत पार पडली आहे. परीक्षा केंद्रांवर सरकार आणि एनटीएच्या सर्व निर्देशांचे पालन करण्यात आले. नियमांनुसार चेकींग, फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक नंतरच उमेदवारांनी प्रवेश देण्यात आला. जे उमेदवार वैध एडमिट कार्ड आणि गाईडलाईनचे पालन करत आहेत. त्यांना परीक्ष केंद्रावर प्रवेश दिला जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड
  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
  • कंत्राटदार संघटनेचा सरकारला मोठा इशारा, मुंबईतील कंत्राटदाराने वैतागून संपवली जीवनयात्रा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in