
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्समध्ये सामना झाला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. RCB समोर विजयासाठी 206 धावांचं मोठं टार्गेट होतं. 200 प्लस धावांचा पाठलाग करायचा असल्याने बंगळुरुला दमदार सुरुवात गरजेची होती. फिल सॉल्ट कालच्या सामन्यात खेळत होता. तो एक आक्रमक ओपनर म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. विराट कोहलीने सुद्धा आपल्या नावाला अनुरुप खेळ दाखवला. त्याच्या फलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गुजरात टायटन्स विरुद्ध सहज विजय मिळवता आला. विराटने 44 चेंडूत 81 धावा फटकावल्या. यात 8 फोर आणि चार सिक्स आहेत.
खरंतर विराटचा हा जलवा दिसलाच नसता, जर गुजरातचा प्लेयर वॉशिंग्टन सुंदरने ती चूक केली नसती तर. वॉशिंग्टन सुंदरने सुरुवातीलाच मोठी चूक केली, जी गुजरातच्या टीमला नंतर खूप भारी पडली. त्या एका चुकीने सगळ्या सामन्याचा नूरच पालटला. सुरुवातीच्या ओव्हर्स मध्ये मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीत ती धार दिसत होती. त्याने आपल्या शानदार चेंडूवर विराट कोहलीला चकवलं. सिराजने विराटला लवकर शॉट खेळायला भाग पडला. चेंडू बॅटची कड घेऊन शॉर्ट मिड-विकेटला उभ्या असलेल्या वॉशिंग्टन सुंदरकडे गेला. खरंतर सुंदरसाठी ही एक सोपी कॅच होती. सहसा सुंदर अशा कॅच कधी सोडत नाही, पण दबावामुळे त्याच्याकडून तो झेल सुटला. शुन्यावर कोहली आऊट झाला असता. पण त्याला नशिबाने जीवदान मिळालं.
त्याच्यावर विलनचा ठप्पा पडला
कोहलीला मिळालेलं हे जीवनदान आरसीबीसाठी कुठल्या संजीवनीपेक्षा कमी नव्हतं. विराटने ही कॅच सुटल्यानंतर 44 चेंडूत 81 धावा कुटल्या. यात 8 फोर आणि 4 सिक्स आहेत. या इनिंगच्या बळावर आरसीबीने हा सामना आरामात 19 व्या ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून जिंकला. या चुकीमुळे वॉशिंग्टन सुंदरवर विलनचा ठप्पा पडला.
115 धावांची भागीदारी
206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. जेकब बेथेल 10 चेंडूत 14 धावांवर मोहम्मद सिराजच्या चेंडूवर आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने मोर्चा संभाळला. दुसऱ्या विकेटसाठी 59 चेंडूत 115 धावांची भागीदारी केली. पडिक्कलने दमदार फलंदाजी केली. त्याने 27 चेंडूत 55 धावा केल्या. यात दोन फोर आणि सहा सिक्स होते.
Leave a Reply