• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB | अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा

June 1, 2026 by admin Leave a Comment


इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दमदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत आरसीबीने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 155 धावांची मजल मारली आणि आरसीबीसमोर 156 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात आरसीबीने हे लक्ष्य 18 षटकांत 5 विकेट्स गमावून पूर्ण केले.
आरसीबीच्या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. विराटने नाबाद 75 धावांची शानदार खेळी करत संघाचा विजय जवळपास एकहाती निश्चित केला. त्याला टीम डेव्हिडने 24 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली, तर जितेश शर्मासोबतच्या भागीदारीने आरसीबीचा विजय शिक्कामोर्तब केला.
गुजरातकडून राशिद खानने नवव्या षटकात रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या यांना बाद करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट कोहलीच्या संयमी आणि आक्रमक खेळीसमोर गुजरातचे प्रयत्न अपुरे ठरले. या विजयासह आरसीबीने आयपीएल इतिहासातील एक महत्त्वाचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी Chennai Super Kings, Mumbai Indians आणि Kolkata Knight Riders यांनी ही कामगिरी केली होती.
तसेच 2018 पासून सुरू असलेली ‘क्वालिफायर-1 विजेता संघच आयपीएल चॅम्पियन’ ही परंपराही आरसीबीने कायम राखली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आरसीबीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना शाहरुख, ना रजनीकांत, या अभिनेत्याने एका चित्रपटासाठी घेतलं 325 कोटी रुपये मानधन
  • ज्या जागेवर नमाज पठण, तेथे पंतप्रधान मोदींचा 35 हजार लोकांसोबत मोठा इतिहास, काँग्रेस नेत्याचा आक्षेप कारण…
  • या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक
  • Vaibhav Sooryavanshi: अरे ही तर अफवा आहे…श्रीलंकेला गपगार केल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?
  • मोठी बातमी! खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता आणखी एका आमदाराचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा, शिंदेंनी गेम फिरवला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in