• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ते गाणं पाहिलं अन् शाहरुखने घराच्या खिडक्या उघडणे केले बंद, 58 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये

August 24, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड चित्रपटांमधील गाणी ही कायमच चर्चेचा विषय ठरतात. ही गाणी प्रदर्शित होऊन कित्येक वर्ष उलटली तरी देखील त्यांची क्रेझ कायम असते. सध्या असेच एक 58 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले एक गाणे चर्चेत आहे. हे गाणे ऐकून बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने घराच्या खिडक्या उघडणे बंद केले होते. आता हे गाणे कोणते आहे? तुम्ही ओळखलेत का? नाही ना? चला जाणून घेऊया…

कोणतं आहे गाणं?

सायरा बानो आणि शाहरुख खान यांचे नाते खूप खास आहे. त्या किंग खानला आपल्या मुलासारखे मानतात. एका पुरस्कार सोहळ्यात एसआरकेने सायरा बानोच्या ‘पडोसन’ची प्रशंसा करताना म्हटले होते, “सायरा जी, मी याला थोडे वैयक्तिक करतो की, तुमचा ‘पडोसन’ पाहिल्यानंतर मी घराच्या खिडक्या उघडणेच बंद केले. समोरच्या खिडकीवर चंद्रासारखे सुंदर तोंड असले तरी चालेल, पण तुमच्यासारखे नाही.”

कल्ट क्लासिक चित्रपट ‘पडोसन’ हिंदी सिनेमातील सर्वात जास्त आवडलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटात सायरा बानोचा अभिनय आणि किशोर कुमार, महमूद व सुनील दत्त यांची कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सायरा बानोच्या वेगवेगळ्या सुंदर अवतारांनीही चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.

‘पडोसन’ चित्रपटाची गणना त्या काळातील क्लासिक कल्ट चित्रपटांमध्ये होते. यात एकाचवेळी चार मोठे कलाकार होते. सुनील दत्तने भोला तर किशोर कुमारने विद्यापतीची भूमिका साकारली. दोघांची मैत्री पडद्यावर खूप छान दिसत होती. एका मित्राने दुसऱ्याच्या प्रेमासाठी स्वतःचा आवाज देऊन टाकला, तर महमूद साहेबांनी मास्टर पिल्लई बनून भोला आणि विद्यापतीच्या योजनेत अडथळा आणला.

चित्रपटाची कथा आणि संवाद दोन्ही मजेदार आहेत. कदाचित त्यामुळेच तो त्या काळातील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने जगभरात २.८ कोटी रुपये कमावले होते. त्याचे बजेट १ कोटीपेक्षा कमी होते, पण उत्कृष्ट कलाकार आणि पटकथेने प्रेक्षकांची मने जिंकली.

अनेक लोकांना ही गोष्ट माहीत नाही की, या चित्रपटात ‘बिंदू’ची भूमिका सायरा बानो सुरुवातीला करू इच्छित नव्हत्या. अभिनेत्रीचे त्यावेळी नुकतेच लग्न झाले होते आणि त्या चित्रपट सोडून वैयक्तिक जीवनावर लक्ष केंद्रित करू इच्छित होत्या. पण महमूद साहेबांनी समजावून सांगितल्यानंतर आणि मनवल्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करायला होकार दिला. त्यांच्यासाठी खास मद्रासमध्ये चित्रपटाचे सेट उभारण्यात आला होता. ‘पडोसन’च्या शूटिंगबद्दल बोलताना सायराने सांगितले होते की, सेटवर शूटिंग करताना इतका आनंद येत असे की, अनेकदा जास्त हसल्यामुळे शूटिंग थांबवावे लागे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in